AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDIA Bloc Protest: ‘एक कचोरी, दोन समोसे, ज्ञानेश…’, इंडिया आघाडीच्या घोषणांनी कुणाला काटे टोचले?

INDIA Bloc Protest: इंडिया आघाडीने आज दिल्ली दणाणून सोडली. वोट चोर गद्दी छोड, ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा अशी नारेबाजी करण्यात आली. SIR, ज्ञानेश कुमार, निवडणूक आयोगाचा कारभार याविरोधात दिल्लीत जवळपास 19 पक्षाचे खासदार रस्त्यावर उतरले आहेत.

INDIA Bloc Protest: 'एक कचोरी, दोन समोसे, ज्ञानेश...', इंडिया आघाडीच्या घोषणांनी कुणाला काटे टोचले?
इंडिया आघाडीकडून घोषणाबाजी
| Updated on: Oct 06, 2026 | 12:14 PM
Share

केंद्रीय निवडणूक आयोग, SIR, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीत विरोधी पक्षांनी एल्गार पुकारला आहे. एकीकडे जंतरमंतरवर आप आणि डावे आंदोलन करत असतानाच आता 19 पक्षांचे खासदार रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वात सपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांच्यासह इतर अनेक घटक पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोरील परिसर दणाणून सोडला आहे. यावेळी वोट चोर गद्दी छोड, ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा अशी नारेबाजी करण्यात आली.

‘एक कचोरी, दोन समोसे, ज्ञानेश कुमारांचा काय भरसो?’

‘एक कचोरी, दोन समोसे, ज्ञानेश कुमारांचा काय भरसो?’ अशा घोषणांमधून तुफान टोलेबाजी करण्यात आली. संसद परिसरात अनेक खासदार वेगवेगळ्या आशयाचे बॅनर घेऊन आले होते. निवडणूक आयोगाचा रबर स्टँप भाजपकडे असल्याचे एक बॅनर लक्ष वेधत होते. तर दुसरीकडे भाजपच CEC, मुख्य निवडणूक आयुक्त असल्याचा बॅनर झळकला. भाजपच इतर पक्षांची मत चोरी करत असल्याचा दावा करण्यात आला. तर भाजपला स्वतंत्र कार्यालय करण्याची गरज नाही, निवडणूक आयोग हेच त्यांचे कार्यालय आहे, अशा आशयाच्या एका बॅनरची परिसरात जोरदार चर्चा रंगली.

गणपती चुकीच्या लोकांची साथ कशी देणार?

इंडिया आघाडीच्या मोर्चापूर्वी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ज्ञानेश कुमार हे गणेशजी असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी गणपती बाप्पा हे चुकीच्या लोकांची मदत करत नाहीत. बप्पा हा मनापासून केलेली प्रार्थना ऐकतो. शुभारंभ त्यांच्यापासूनच होतो. गणपती आपले रक्षण करतो असे त्या म्हणाल्या. 30 सप्टेंबर रोजी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक झाली होती. या बैठकीतच इंडिया आघाडीने आज मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. संसद भवनापासून मोर्चाला सुरुवात झाली. पोलिसांनी हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाजवळ अडवला आहे. तिथेच खासदारांनी धरणे सुरू केले आहे.

19 पक्षाचे नेते, खासदार मोर्चात

निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, शिवसेनेचे संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासह इतर अनेक पक्षांचे अनेक बडे नेते, खासदार सहभागी झाले आहेत. या मोर्चात डीएमके आणि आप हे पक्ष सहभागी झाले नाहीत. जंतरमंतरवर आप आणि डावे पक्ष दोन दिवसांपासून आंदोलन करत आहेत.

Follow Us
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार,
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार, खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी दिली माहिती
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी ट्विट करत दिली मोठी अपडेट
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर...
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर घणाघात; थेट म्हणाले...
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?