AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दांडूके चालवा, बंदूका रोखा, आम्ही जाणारच… संजय राऊत यांचा सरकारला मोठा इशारा

सरकारने संसद ते निवडणूक आयोगापर्यंतच्या रस्त्यावर बॅरिकेड्स उभे केले आहेत. देशभरातून सशस्त्र पोलिसांच्या फलटणी आणून रस्ते बंद केले आहेत. 300 खासदारांना घाबरणारे हे सरकार आहे. तुम्ही संसदेत बोलू देत नाही. आम्ही रस्त्यावर उतरतो तेव्हा काठ्या आणि बंदूका आमच्यावर उचलता? असा संतप्त सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.

दांडूके चालवा, बंदूका रोखा, आम्ही जाणारच... संजय राऊत यांचा सरकारला मोठा इशारा
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 06, 2026 | 10:14 AM
Share

निवडणूक आयोगावर खासदारांचा मोर्चा आहे. आम्ही 250 ते 275 खासदार शांतेत मोर्चा काढणार आहोत. पण हे सरकार खासदारांना घाबरतंय. खासदारांना घाबरून सरकारने संसद भवन ते निवडणूक आयोगपर्यंत सशस्त्र दल तैनात केले आहेत. सर्वत्र नाकाबंदी केली आहे. आम्हाला रोखण्यासाठी सरकारचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. पण लक्षात ठेवा, आमच्यावर दांडूके चालवा, बंदूका रोखा आम्ही निवडणूक आयोगावर जाणारच, असा इशाराच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित निवडणूक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी हा इशारा दिला आहे. खासदारांचा मोर्चा आहे. साधारण राज्यसभा आणि लोकसभेतील मिळून अडीचशे ते पावणे तीनशे खासदार मोर्चाला उपस्थित राहतील. संसद भवन ते निवडणूक आयोगपर्यंत सशस्त्र दल तैनात करण्यात आले आहेत. नाकाबंदी केली आहे. हे सरकार खासदारांना घाबरायला लागलं आहे. जे खासदार पाच पाच दहा दहा लाख मतदारांचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांना आयोगाच्या मुख्यालयात जाण्यापासून रोखणं हे लोकशाहीच्या कोणत्या तत्त्वात बसतं माहीत नाही. आम्हाला निवेदन द्यायचं आहे. त्यासाठी मोर्चा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

त्यांना राजीनामा द्यावाच लागणार

एसआयआरमध्ये घोटाळे करून भाजपला मदत केली जात आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही निघालो आहोत. लोकशाहीची हत्या कशी सुरू आहे, हे जग पाहत आहे. आम्हाला रोखलं तरी जाऊ. दंडूके चालवले, बंदूका रोखल्या तरी आम्ही जाऊ. सर्व खासदार येतील. आजचा मोर्चा हा दिशादर्शक ठरणार आहे. देशातील राज्याराज्यात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना राजीनामा द्यावा लागणारच आहे, असं राऊत यांनी म्हटलंय.

कोर्टाला अंधारात ठेवलं

काल सर्वोच्च न्यायालयाने आयोगाचे कान उपटले आहे. एसआयआरमधील बदल कोर्टाच्या संमतीने झाला नाही. कोर्ट अंधारात आहे. हे कोर्टाने स्पष्ट केल्यावर ज्ञानेश कुमार यांनी कोणता खेळ केला हे लक्षात येतं. कोणत्याही बहुमत आणि सहमती शिवाय केलेले बदल हे धक्कादायक आहेत. एकमताने, बहुमताने निर्णय झाले नाही. कोर्टाची दिशाभूल ज्ञानेश कुमार यांनी केली आहे. अशा व्यक्तीला खूर्चीवर ठेवू नये. जितके दिवस ते खूर्चीवर राहतील तितके दिवस मोदी आणि शाहांचं अध:पतन सुरू राहील, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे केजरीवालांशी बोलणार

आम आदमी पार्टीने या आंदोलनात सहभागी व्हावं हे आमचं मत आहे. आपण स्वतंत्रपणे वेगळी चूल मांडून ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील लढाई जिंकू शकत नाही. ज्ञानेश कुमार हे मोदी शाहांचे एजंट आहेत. प्रत्येकाने अहंकार विसरला पाहिजे. स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसच्या नेतृत्वात डावे आणि समाजवादी उतरले होते. तसंच आताही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं सांगतानाच उद्धव ठाकरे, केजरीवाल आणि स्टॅलिन यांचा कायम संवाद असतो. भविष्यात यावर चर्चा होईल, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?