AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंतराळातून चीन, पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर नजर, 52 सैन्य उपग्रहांचे होणार लॉन्चिंग

उपग्रहांचा वापर प्रामुख्याने लष्करी, गुप्तचर, पर्यावरणीय आणि व्यावसायिक कारणांसाठी करण्यात येतो. उपग्रहांमध्ये उच्च-रिझोल्यूशन कॅमेरे, रडार, इन्फ्रारेड सेन्सर आणि इतर उपकरणे असतात. त्यामुळे रिअल-टाइममध्ये किंवा नियमित अंतराने प्रतिमा, व्हिडिओ आणि इतर डेटा मिळतो.

अंतराळातून चीन, पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर नजर, 52 सैन्य उपग्रहांचे होणार लॉन्चिंग
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 30, 2025 | 2:51 PM
Share

ऑपरेशन सिंदूर दरम्यान उपग्रह तंत्रज्ञानाचा झालेला फायदा सर्वांना माहीत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर, सिग्नल जॅमिंग आणि रडार तंत्रज्ञानाची काय भूमिका राहिली? ते सर्व जगाने पाहिले. त्यावेळी भारताने 22 मिनिटे पाकिस्तानच्या संरक्षण संस्थांची सिग्नल प्रणाली जाम केली होती. या 22 मिनिटांत भारताने पाकिस्तानवर हल्ला करुन दहशतवादी तळ नष्ट केली. इलेक्ट्रॉनिक वॉरफेयरचे हे युद्ध अंतराळात फिरणाऱ्या भारतीय उपग्रहांमुळे शक्य झाले.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान फायदा

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान, पाकिस्तान व्याप्त काश्मीर, जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तैयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन यांच्या ठिकाणांची अचूक माहिती भारताला मिळाली. त्या इंटेलिजेन्स इनपूटच्या मदतीने भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील बहावलपूर, मुजफ्फराबाद, कोटली आणि सियालकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारत उपग्रहाचे हे तंत्रज्ञान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

अर्थसंकल्पात भरीव तरतूद

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने शत्रू क्षेत्रांवरील देखरेख वाढवण्यासाठी ५२ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे भारताला दक्षिण आशियासह संपूर्ण जगातील प्रतिमा उपग्रहच्या माध्यमातून मिळू शकतील. गरज पडल्यास या उपग्रहांचा वापर भारत लष्करी उद्देशांसाठी करणार आहे. भारताने अंतराळातून देखरेख ठेवण्यासाठी मागील वर्षी २६ हजार ९६८ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. या उपग्रहांचे नेटवर्क या प्रकल्पाचा भाग आहे. या योजनेत इस्त्रोचे २१ उपग्रह आणि तीन खासगी कंपन्यांचे ३१ उपग्रहांचा समावेश आहे.

संरक्षण मंत्रालयाचे लक्ष

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला उपग्रह २०२६ मध्ये प्रेक्षपित करण्यात येणार आहे. या योजनेतील शेवटच्या उपग्रहाचे लॉचिंग २०२९ मध्ये होणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडून या योजनेवर लक्ष ठेवले जात आहे. या उपग्रहांच्या नेटवर्कमुळे चीन, पाकिस्तान आणि हिंद महासागरातील देखरेख अधिक प्रभावी होणार आहे. शत्रूंच्या प्रत्येक हालचालींची माहिती या उपग्रहांच्या माध्यमातून मिळणार आहे.

उपग्रहांचा वापर प्रामुख्याने लष्करी, गुप्तचर, पर्यावरणीय आणि व्यावसायिक कारणांसाठी करण्यात येतो. उपग्रहांमध्ये उच्च-रिझोल्यूशन कॅमेरे, रडार, इन्फ्रारेड सेन्सर आणि इतर उपकरणे असतात. त्यामुळे रिअल-टाइममध्ये किंवा नियमित अंतराने प्रतिमा, व्हिडिओ आणि इतर डेटा मिळतो.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी