AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-चीन संबंधामधील गोडी आणखी वाढली, भारताच्या या निर्णयामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का

India China Relation : भारत आणि चीन आता आणखी जवळ येताना दिसत आहेत. भारताने अलीकडेच चिनी नागरिकांसाठी पर्यटन व्हिसा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमधील संबंध आता सुधारू लागल्याने अमेरिकेची चिंता वाढली आहे.

भारत-चीन संबंधामधील गोडी आणखी वाढली, भारताच्या या निर्णयामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
India China Relation
| Updated on: Nov 21, 2025 | 7:57 PM
Share

भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणलेले असताना भारत आणि चीन आता आणखी जवळ येताना दिसत आहेत. भारताने अलीकडेच चिनी नागरिकांसाठी पर्यटन व्हिसा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता चीनी पर्यटक भारतात सहजपणे प्रवेश करू शकतात. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार आहे. दोन्ही देशांमधील सीमेवर असलेला तणाव आता कमी झाला आहे, त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारत असल्याचे दिसत आहे. यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे.

चिनी पर्टटकांसाठी व्हिसा देण्यास सुरुवात

भारत चीन आणि रशिया हे देश एकत्र येऊ नये अशी अमेरिकेची इच्छा आहे, कारण असे झाल्यास अमेरिकेसमोरची चिंता वाढू शकते. 2020 मध्ये गलवान खोऱ्यात सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर चिनी नागरिकांसाठी व्हिसा देणे बंद केले होते. मात्र आता संबंध सुधारत असताना व्हिसा पुन्हा एकदा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हा निर्णय दोन्ही देशांमधील संपर्क वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

भारत आणि चीन संबंध पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्न

या निर्णयाबाबत सूत्रांनी सांगितले की, गेल्या काही काळापासून भारत आणि चीनने संबंध स्थिर करण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून 2020 पासून बंद असलेली विमानसेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. तसेच कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे आणि बिझनेस आणि इतर श्रेणीतील प्रवाशांसाठी व्हिसा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची अपेक्षा आहे.

एलएसीवरील सैन्य मागे घेण्याबाबत एकमत

दोन्ही देशांच्या सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी ऑक्टोबर 2024 मध्ये, दोन्ही देशांनी एलएसीवरील सैन्य मागे घेण्याचे मान्य केले आहे. या करारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कझान येथे भेट झाली होती. त्या भेटीत दोन्ही संबंध सामान्य करण्याचा आणि सीमा वाद सोडवण्याबाबत चर्चा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि सीमा वाटाघाटीसाठी विशेष प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या. यामुळे बऱ्याच क्षेत्रांमधील संबंध सुधारले आहेत.

ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.