भारताचं चीनला मोठं गिफ्ट, चायनाकडून जोरदार कौतुक
भारतानं नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे चीनने भारताचं कौतुक केलं असून, भारताचा हा निर्णय दोन्ही देशांसाठी खूप फायद्याचा असल्याचं चीनने म्हटलं आहे. यामुळे व्यापाराला आणखी गती येणार आहे.

अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अमेरिका आणि भारतामधील संबंध ताणले गेले आहेत, तर दुसरीकडे भारताची रशिया आणि चीनसोबत जवळीक वाढताना दिसत आहे. त्यातच आता भारतानं मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे भारतानं आता चीनी व्यावसायिकांसाठी व्यावसाय व्हिसाची प्रक्रिया जलद केली आहे. भारताच्या या निर्णयाचं चीनकडून कौतुक करण्यात आलं आहे. भारताच्या या निर्णयामुळे चीनी व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतानं उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद असून, दोन्ही देशांच्या फायद्याचं असल्याची प्रतिक्रिया यावर चीनने दिली आहे. तर दुसरीकडे भारतानं आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, तो म्हणजे गेल्याच महिन्यात भारतानं थेट भारत ते चीन विमान सेवा पुन्हा एकदा सुरू केली आहे, कोरोना काळापासून भारत चीन थेट विमान सेवा बंद करण्यात आली होती.
भारताचं कौतुक
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गुओ जियाकुन यांना नुकताच भारतानं चीनी व्यावसायिकांच्या व्यावसाय व्हिसाची प्रक्रिया जलद करण्याचा निर्णय घेतला आहे, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, याला उत्तर देताना ते म्हणाले की, भारतानं अतिशय सकारात्मक पाऊल उचललं आहे, भारतानं उचललेले हे पाऊल दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, भारताच्या या निर्णयाचं आम्ही कौतुक करतो. भारताच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणखी सुलभ होईल, तसेच देवाण -घेवाण देखील वाढेल, द्विपक्षीय व्यापाराला गती येईल.
भारत -चीन थेट विमान सेवा
दरम्यान भारतानं गेल्याच महिन्यामध्ये भारत ते चीन थेट विमान सेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना काळात भारतानं ही विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा भारत ते चीन थेट विमान सेवा सुरू झाली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील दळणवळण अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफवर प्रतिक्रिया देताना आम्ही भारताच्या वस्तूंचं आमच्या बाजारपेठेत स्वागत करू असं चीनने म्हटलं होतं.
