AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Pakistan Tension : पहिली लढाई भारताने जिंकली, भारताचा पाकिस्तानवर मोठा विजय, हे घ्या पुरावे

India-Pakistan Tension : भारताने पहिल्या लढाईत पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. काहीजण या लढाईचे पुरावे मागतील. हो, त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. पाच घटनांमधून पाकिस्तान लढण्याआधी हरल्याच दिसतय. या पाच घटना कुठल्या? भारताने पाकिस्तानवर कुठल्या लढाईत विजय मिळवलाय? त्या बद्दल विस्ताराने जाणून घ्या.

India-Pakistan Tension : पहिली लढाई भारताने जिंकली, भारताचा पाकिस्तानवर मोठा विजय, हे घ्या पुरावे
भारत-पाकिस्तान युद्धImage Credit source: गुगल
| Updated on: May 03, 2025 | 11:23 AM
Share

सध्याच्या जमान्यात मानवी प्रगती बरोबर युद्धाच स्वरुपही बदलून गेलय. युद्ध म्हणजे फक्त आमने-सामनेची लढाई नसते. युद्धाचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्पेस वॉर, सायबर वॉर यामध्ये येतं. अशा प्रकारच्या युद्धात जिवीतहानी होत नाही, पण शत्रूच्या सर्व यंत्रणा ठप्प होऊन जातात. स्पेस वॉरमध्ये सिग्नल जॅम करणं, सॅटलाइट निकामी करणं त्यामुळे शत्रूच्या प्रदेशातील हालचाली, घडामोडींची माहिती मिळणं बंद होऊन जातं. सायबर वॉरमध्ये वेबसाइट हॅक केल्या जातात. बँकिंगस आणि अन्य महत्त्वाच्या संगणकीय यंत्रणा बंद पाडल्या जातात. त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प होतात. हे सध्याच्या आधुनिक युद्धाच स्वरुप आहे. भारताने सध्या तरी अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारचा हल्ला पाकिस्तानवर केलेला नाही. फक्त व्यवहार, प्रवास बंद करणारे काही कूटनितीक निर्णय घेतले आहेत.

भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अजून लष्करी कारवाईच पाऊल उचलेलं नाही. भारत बदला घेणार हे निश्चित. पण तो कसा, कधी आणि कुठे हे कोणालाच माहित नाहीय. प्रत्यक्ष युद्धाआधी एक मानसिक लढाई लढली जाते. त्याला सायकोलॉजिकल वॉर म्हणतात. या लढाईत भारताने पाकिस्तावर मोठा विजय मिळवला आहे. आता काही जण याचे पुरावे मागू शकतात, याचे पुरावे आहेत. महत्त्वाच म्हणजे उघड्या डोळ्यांना दिसणारे पुरावे आहेत. पाकिस्तानता सध्या ज्या हालचाली सुरु आहेत, तिथले राज्यकर्ते जे निर्णय घेत आहेत. त्यांची कृती यातून ते पार बिथरुन गेल्याच दिसतय. हाच भारताने पाकिस्तानवर सायकॉलॉजिकल युद्धात त्यांच्यावर मोठा विजय मिळवल्याचा पुरावा आहे.

हे घ्या पाच पुरावे 

1) इंटेलिजन्सच्या रिपोर्ट्नुसार पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील तीन मोठे लॉन्चपॅड्स रिकामी झाले आहेत. या तिन्ही लॉन्चपॅडवर 22 एप्रिलआधी लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अन्य दहशतवादी संघटनांचे प्रत्येकी 10 ते 12 दहशतवादी होते. आता हे सर्व दहशतवादी लॉन्चपॅड रिकामी करुन पाकिस्तानात निघून गेले आहेत.

2) POK मधील 1000 हजार मदरसे बंद करण्यात आले आहेत. POK मधील हॉटेल्स, मदरसे पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले आहेत.

3) पाकिस्तानने खबरदारी म्हणून आपले काही महत्त्वाचे एअरस्पेस बंद केले आहेत.

4) पाकिस्तानातील खैबर-पख्तूनख्वा प्रांतात युद्धाच्या स्थितीत हवाई हल्ल्याची माहिती देणारे सायरन बसवण्यात आले आहेत. काही किलोमीटरपर्यंत या सायरनचा आवाज ऐकू येतो.

5) पाकिस्तानच्या एका मंत्र्याने दोन दिवसांपूर्वी भारत हल्ला करणार या भितीने मध्यरात्री पत्रकार परिषद घेतली.

या पाच घटना पाकिस्तान कारवाईच्या भितीने बिथरुन गेल्याचे पुरावे आहेत. भारताने प्रत्यक्ष युद्धाआधी मानसिक लढाईत पाकिस्तानवर मिळवलेला हा मोठा विजय आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.