37 दिवसांपासून क्रुझवर अडकलेल्या 146 भारतीयांची सुटका, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझवर महिनाभरापासून अडकलेल्या 146 भारतीय खलाशांना मुंबईच्या बंदरावर उतरण्याची परवानगी (Indian Sailors released after Cm Uddhav Thackeray Effort) मिळाली.

37 दिवसांपासून क्रुझवर अडकलेल्या 146 भारतीयांची सुटका, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई : देशभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला (Indian Sailors released after Cm Uddhav Thackeray Effort) आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाने मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझवर महिनाभरापासून अडकलेल्या 146 भारतीय खलाशी आणि नाविकांना मुंबईच्या बंदरावर उतरण्याची परवानगी मिळाली.

मुख्यमंत्र्यांनी स्वत: नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी (Indian Sailors released after Cm Uddhav Thackeray Effort) चर्चा केल्यानंतर काल (21 एप्रिल) रात्री केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचा एक आदेश जारी केला. यामुळे मरिला डिस्कव्हरी क्रुझवर अडकलेल्या 146 खलाशी आणि नाविकांची सुटका झाली. विशेष म्हणजे याचा फायदा समुद्रात ठिकठिकाणी जहाजांवर अडकलेल्या सुमारे 40 हजार खलाशी, जहाजावरील कर्मचाऱ्यांना सुद्धा होणार आहे.

आज (22 एप्रिल) सकाळपासूनच या क्रुझवरील खलाशांना आणि कर्मचाऱ्यांना मुंबईच्या बंदरावर उतरवणे सुरु होईल. त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. तसेच प्रसंगी त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी एक इमारतही उपलब्ध आहे.

दरम्यान मरिला डिस्कव्हरी ही क्रुझ कोचीन, न्यू मंगलोर, गोवा आणि मुंबई या ठिकाणी 2 ते 6 एप्रिल दरम्यान पोहोचणार होती. मात्र या काळात कोरोनाचा उद्रेक सुरु झाला. या क्रुझने लाएम चाबँग या थायलँड जवळ 14 मार्च रोजी सर्व प्रवासी सोडले. ही क्रुझ 12 एप्रिल रोजी कोचीन येथे पोहचली. पण या क्रुझवरील कर्मचाऱ्यांना उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली.

त्यानंतर ही क्रुझ मुंबईजवळच्या समुद्रात 14 एप्रिल रोजी पोहचली. मात्र तेव्हापासून त्यावरील कर्मचारी मुंबईला उतरण्याची वाट पाहत होते. जहाजावरील कुठल्याही कर्मचाऱ्यास कोरोना लागण झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. थायलँड सोडून 37 दिवस होऊन गेले होते, मात्र जहाजावर कुठलाही संसर्ग नसल्याचे कंपनीने सागितले. तरी परवानगी मिळत नव्हती.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात नौकानयन मंत्रालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. प्रधान सचिव विकास खारगे, आशिष कुमार सिंह आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया हे सातत्याने पाठपुरावा करीत होते.

जहाजांवर अडकलेल्या 40 हजार भारतीय खलाशांना फायदा

काल यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने एक आदेश काढला. यात व्यापारी आणि व्यावसायिक जहाजांवरील कर्मचारी, खलाशी यांना भारतीय बंदरांवर उतरणे तसेच बंदारांवरून जाणे शक्य व्हावे म्हणून निश्चित कार्यपद्धती दिली आहे. यानुसार या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गेल्या 28 दिवसांच्या प्रवासाची माहिती कळविणे, तसेच बंदरावर उतरल्यावर कोविड चाचणी करून घेणे, प्रसंगी क्वारंटाईन करणे, या खलाशी आणि कर्मचाऱ्यांना थेट त्यांच्या घरी सोडण्यासाठी ट्रान्झिट पास, वाहनाची व्यवस्था इत्यादी बाबींचा समावेश आहे. याचा फायदा समुद्रात सध्या विविध जहाजांवर अडकलेल्या 35 ते 40 हजार भारतीय खलाशांना होणार आहे. ही क्रुझ पुढे नॉर्वेसाठी रवाना होणार आहे.

नांदेडच्या गुरुद्वारामध्ये अडकलेले सर्व नागरिक सुखरुप

तर दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि उद्धव ठाकरे यांच्या फोनवरुन चर्चा झाली. यावेळी अमरिंदर सिंह यांनी नांदेडमध्ये अडकलेल्या प्रवाशींना पंजाबमध्ये पाठवण्यासाठी चर्चा केली. तसेच याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रस्ताव मान्य केल्यास सर्व प्रवाशांचा खर्च पंजाब सरकार करेल, असेही त्यांनी सांगितले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी नांदेडमधील गुरुद्वारामध्ये अडकलेले सर्व नागरिक सुखरुप असल्याची माहिती अमरिंदर सिंह यांना (Indian Sailors released after Cm Uddhav Thackeray Effort) दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *