AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indigo Flight Cancellations : इंडिगोचं संकट कायम, आज कुठल्या शहरातून किती उड्डाण रद्द? मुंबईची स्थिती काय? ही पाहा लिस्ट

Indigo Crisis : भारतीय विमान क्षेत्रातील मोठी कंपनी इंडिगोचं संकट अजूनही संपलेलं नाही. हवाई प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. आज कुठल्या शहरातून किती उड्डाणं रद्द झाली आहेत? जाणून घ्या.

Indigo Flight Cancellations : इंडिगोचं संकट कायम, आज कुठल्या शहरातून किती उड्डाण रद्द? मुंबईची स्थिती काय? ही पाहा लिस्ट
IndigoImage Credit source: PTI
| Updated on: Dec 07, 2025 | 11:49 AM
Share

देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोची सेवा अजूनही सुरळीत झालेली नाही. कंपनीला आजही अनेक उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. मागच्या तीन-चार दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्सची अनेक उड्डाणं रद्द झाली आहेत. विमानतळावर प्रवाशांचा संताप दिसत आहे. हजारो प्रवासी अडकले आहेत. एअरपोर्ट्सवर गोंधळाची स्थिती आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, लखनऊ, चंदीगड सारख्या मोठ्या शहरांमध्ये उड्डाणं रद्द होण्याचा सिलसिला कायम आहे. कुठलीही पूर्व सूचना न देता उड्डाण रद्द करण्यामुळे प्रचंड त्रास होतोय, असं प्रवाशांच म्हणणं आहे.

दिल्ली एअरपोर्टवरुन अनेक उड्डाणं रद्द

दिल्ली ते बंगळुरु – रद्द

दिल्ली ते जयपूर – रद्द

दिल्ली ते नागपूर – रद्द

दिल्ली ते ग्वालियर – रद्द

दिल्ली ते चेन्नई – रद्द

हैदराबाद एअरपोर्ट वर मोठं संकट, 115 उड्डाण रद्द

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, शमशाबाद येथे स्थिती गंभीर आहे. तिथून इंडिगोने आज एकूण 115 उड्डाणं रद्द केली आहेत.

54 येणारी फ्लाइट

61 रवाना होणारी फ्लाइट

सकाळी घेतलेल्या या निर्णयाची प्रवाशांना कल्पना नव्हती. त्यामुळे एअरपोर्टवर लांबलचक रांगा आहेत. तक्रारींचा पाऊस पडत आहे.

लखनऊ एअपोर्टवर सुद्धा परिणाम, प्रवाशांच्या रांगा

लखनऊमध्ये सुद्धा उड्डाण रद्द होण्याची स्थिती आहे. आज लखनऊनमधून इंडिगोची पाच उड्डाणं रद्द झाली आहेत. एअरपोर्टवर इंडिगोच्या काऊंटरवर लांबलचक रांगा आहेत. वेळेवर योग्य माहिती दिली नाही, असा सुद्धा प्रवाशांचा आरोप आहे.

मुंबई एअरपोर्टवर 8 उड्डाणे रद्द

मुंबई एअर पोर्टवर सुद्धा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. इंडिगोची 8 उड्डाणं रद्द झाली आहेत.

मुंबई–गोवा

मुंबई–जबलपुर

मुंबई–अहमदाबाद

मुंबई–मदुरै

मुंबई–अयोध्या धाम

मुंबई–पटना

मुंबई–कानपुर

मुंबई–गोरखपुर

मुंबई–बंगळुरु उड्डाण आणि जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं वेळेवर आहेत.

रिफंडसाठी वाट पहावी लागतेय

चंदीगड एअरपोर्टवर इंडिगोची 3 उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. प्रवाशांना पर्यायी उड्डाणं आणि रिफंडसाठी वाट पहावी लागत आहे.

पर्यायी उड्डाणाचे दर प्रचंड

उड्डाणं रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी स्पष्टपणे दिसत आहे. अनेक प्रवाशांनी सांगितलं की, त्यांना वेळीच माहिती दिली नाही. बुकिंगचे पैसे परत मिळवण्यात अडचणी येत आहेत. पर्यायी उड्डाणाचे दर प्रचंड आहेत. इंडिगोने प्रवाशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे. परिस्थिती लवकरच सामान्य होईल असं म्हटलं आहे.

सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.