IndiGo Crisis : इंडिगोचे संकट का निर्माण झाले, विमानतळे झाली एसटी स्थानके, वाचा पूर्ण कहानी…
इंडिगो एअरलाईन्स सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. अनेक विमाने रद्द आणि उशीराने टेक ऑफ घेत असल्याने प्रवाशांचा संताप अनावर होत आहे. विमानाचे तिकीटाचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या काही दिवसा इंडिगोने २००० हून अधिक उड्डाण सेवा रद्द केल्या आहेत. या काय आहे हे संकट ? कशामुळे निर्माण झाले ?

देशाची सर्वात विश्वासार्ह मानली जाणारी विमान वाहतूक कंपनी इंडिगो सध्या मोठ्या संकटात सापडल्याने प्रवासी हवालदिल झाली आहे. गेल्या आठवडाभरात दोन ते तीन हजार विमान उड्डाणे रद्द झाल्याने संपूर्ण देशातील एअरपोर्टची अवस्था एसटी स्थानकासारखी झाली आहे. परंतू अखेर असे संकट का आले की देशाची सर्वात मजबूत एअरलाईनची सिस्टीम अचानक ठप्प का झाली ? का हजारो प्रवाशांना एअरपोर्टवर अडकून पडावे लागले ? कसे काय एका पाठोपाठ इतकी स्थिती ओढवली ? चला विस्ताराने वाचूया…संपूर्ण कहाणी…
कसे वाढले इंडिगोचे संकट?
गेल्या काही दिवसांपासून इंडिगोने फ्लाईट लेट झाल्याने आणि छोट्या तांत्रिक बिघाडाशी लढत आहे. एअरलाईन याला कधी हवामान, तर कधी एअरपोर्टवरील गर्दीला जबाबदार मानले जात होते. परंतू खरे कारण नंतर पुढे आले. सरकारने फ्लाईट ड्यूटी टाईम लिमिटेशन(FDTL)चे नवे नियम लागू केल्यानंतर हा गोंधळ उडाला. या नियमांमागे पायलटना थकव्यापासून वाचवणे हा हेतू होता. परंतू आधी कर्मचाऱ्यांची कमतरता असलेल्या इंडिगोला हे नवे नियम पाळता आले नाहीत. त्यामुळे त्यांचे पितळ उघड पडले आणि हा डोलारा कोसळला.
नव्या सरकारी नियमांनी वाढवले संकट
FDTL च्या नव्या नियमांनुसार पायलटना सक्तीने आराम देणे बंधनकारक झाले. यामुळे मोठ्या संख्येने पायलट आरामासाठी पाठवण्यात आले. परंतू इंडिगोने नवीन भरती न केल्याने त्यांच्याकडे या विमानांना चालवण्यासाठी पायलटच उरले नाहीत. त्यामुळे इंडिगोच्या अनेक विमान उड्डाणांना रद्द करावे लागले. याच मुळे विमान उद्योगातील आजवरचे सर्वात मोठे संकट उभे राहिले.
एअरबस A320 च्या अलर्टनंतर गोंधळ सुरु
त्यातच रात्रीच्या वेळी उड्डाण करताना एअरबस ३२० संबंधिक सुरक्षा अलर्ट आले. त्यामुळे रात्रीच्या उड्डाणांना लागलीच रद्द करावे लागले. नवीन नियम रात्री १२ वाजल्यानंतर लागू झाले होते. ज्यामुळे अचानक मोठ्या संख्येने फ्लाईट्स रद्द होऊ लागल्या. आणि यंत्रणेत मोठी अनागोंदी निर्माण झाली.
इंडिगोचा मोठा आकार बनला कारण
भारतात इंडिगो एअरलाईनचा बाजारातील आकार मोठा आहे. इंडिगोची भारतीय उड्डयन क्षेत्रातील भागीदार ६० टक्के आहे. म्हणजे दर १० प्रवाशांमागे ६ प्रवासी इंडिगोने प्रवास करत असल्याने या अव्यवस्थेचा फटकाही सर्वाधिक प्रवाशांना बसला आहे. हजारो क्रु, डझनावारी पायलट आणि प्रतिदिन २००० हून अधिक उड्डाणांचे शेड्युल झटक्यात विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.
DGCA चा यू-टर्न
सातत्याने विमाने रद्द होऊ लागल्याने प्रवाशांचा वाढता रोष पाहून अखेर DGCA ला नमते घेत हे पायलट आणि क्रुच्या सुरक्षेसाठी केलेले नियम तातडीने शिथील करावे लागले. त्यामुळे आता काही महिने इंडिगोला या नियमातून सुटका मिळाली आहे. त्यामुळे पायलटचे रोटेशन सोपे होऊन हळूहळू गाडी रुळावर येत आहे.
पायलट संघटनेची नाराजी
पायलट युनियनने आरोप केला आहे की इंडिगो व्यवस्थापनाला आधीच नव्या नियमांची माहिती असतानाही त्यांनी तयारी केली नाही. कंपनीने वैमानिक आणि क्रु स्टाफची भरती केली नाही.त्यांनी अधिक भरती करुन पायलटची संख्या वाढवायला हवी होती. परंतू एअरलाईन त्याऐवजी स्टाफ आणखी कमी केला असाही आरोप युनियनने केला आहे.
प्रवाशांचा बांध सुटला…
या अव्यवस्थापनाला कोणीही जबाबदार असो इंडिगोची बेपर्वाई असो की सरकारी नियम , याचा परिमाण शेवटी प्रवाशांना भोगावा लागला. दरदिवशी शेकडो उड्डाणे रद्द झाल्याने तिकीटांचे दर आकाशाला भिडू लागले. आणि एअरपोर्टला अगदी एसटी स्थानक किंवा रेल्वे स्थानकाची अवकळा आली आहे.
सरकारवर दबाव आणण्यासाठी खेळी
आज सात दिवस झाले तरीही इंडिगो एअरलाईन्सची ही समस्या कमी झालेली नाही. अजूनही अनेक विमानतळांवर फ्लाईट्सचे रेग्युलेशन नीट झालेले नाही. हे जाणून बुझून केले जात आहे की यात खरेच काही अशी समस्या आहेत ज्यास दूर करण्यास अजून वेळ लागणार आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या पायलट्सनी अनेक आरोप केले आहेत. पायलट्सच्या मते जाणून बुझून फ्लाईट रद्द केल्या जात आहेत.आणि त्यांच्या डिलेचे संकट तयार केले जात आहे. या संकटाने संपूर्ण आठवडा विमानसेवा कोमात गेल्या आहेत. मॅनेजमेंटने नवीन सेफ्टी नियमांना लागू करण्यात व्यत्यय आणला आणि सरकारला बदललेल्या फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन (FDTL)नियमांना रोखण्यासाठी दबाव आणला.
पायलट्सने प्रश्न केला आहे की बदललेल्या FDTL नियम एअरलाईनमध्ये केवळ ६५ कॅप्टन आणि ५९ फर्स्ट ऑफिसरच्या कमतरतेने हजारो फ्लाईट्स कसे काय रद्द किंवा उशीराने उड्डाणे घेऊ शकतात. ही समस्या सरकारवर बदललेल्या फ्लाईट ड्यूटी टाईम लिमिटेशन नियमांना रोखण्यासाठी दबाव बनवण्यासाठी ही समस्या मुद्दामहून निर्माण केल्याचा आरोप पायलट्सने केलेला आहे.
केवळ ५ -७ टक्के फ्लाईट्सवर परिमाण झाला असता.
एका पायलटने सांगितले की इंडियो एक दिवसात सुमारे २,२०० फ्लाईट्स चालवते. जर ६५ कॅप्टन आणि २१२ फर्स्ट ऑफीसरवर परिणाम होत असेल तर याचा परिणाम केवळ ५ ते ७ टक्के फ्लाईट्सवर होईल. दोन वर्षांपूर्वी आलेल्या नव्या FDTL नियमांना माघारी घेण्यास सरकारला मजबूर केले जात आहे.
एअरलाईन पायलट्स एसोसिएशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट साग्निक बनर्जी यांनी सांगितले की फ्लाईट्सची सुरक्षा धोक्यात आहे. एअरलाईन्सकडून त्यांचे म्हणणे पटवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केले जात आहेत.ते पायलटच्या सुरक्षेऐवजी नफ्याला प्राधान्य देत आहेत. FDTL चे बदलेले नियम आणि ज्याचा SOPs वर्षांपासून वेळेवर परफॉर्मेंस राखण्यासाठी लक्षपूर्वक फॉलो केला गेला होता. त्यांना नजरअंदाज केले गेले आहे.
केवळ १२४ पायलटची गरज
जेव्हा नियम लागू झाले तेव्हा ४,५८१ पायलट्स उपलब्ध होणे गरजेचे होते. ज्यात केवळ १२४ पायलट्सची आणखी गरज होती असे साग्निक बनर्जी यांनी म्हटले आहे. जर स्टँडबायमधून कोणा पायलट्सला बोलावले जात आहे. तर सर्वसाधारणपणे डिपोर्चरच्या ८ ते १० तास आधी त्यांना कॉल येतो. परंतू अचानक हे कॉल डिपार्चरच्याआधी केवळ १ ते २ तास आधी येऊ लागल्याचे एका पायलट्सने सांगितले.
एका पायलटने सांगितले की सर्वसाधारणपणे एकमेकांच्या शेजारी पार्क होणारे प्लेन ६० किमी अंतरावर होते. अशा एअरपोर्टवर अलिकडे खूप दूर-दूर पार्क केले होते. ज्यामुळे क्रुच्या रिपोर्टींग टाईमला उशीर झाला. आता जास्तीत जास्त पायलट एका चांगल्या पारदर्शी सिस्टीमची मागणी करत आहेत. जे नसल्याने गेल्या आठवडाभर संकट निर्माण झाले आहे. आतापर्यंतची ही सर्वात गोंधळाची स्थिती होती असे त्यांचे म्हणणे आहे.
