AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आयएसआयच्या गुप्तहेराला अटक, भारतीय लष्कराची गोपनीय माहिती थेट पाकिस्तानात, दोन वर्षांपूर्वी…

भारताने पाकिस्तानविरोधात थेट ऑपरेशन सिंदूर सुरू केले. यादरम्यान भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी हल्ले उद्धवस्थ केली. मात्र, आता यादरम्यानच धक्कादायक माहिती पुढे येताना दिसत आहे.

मोठी बातमी! आयएसआयच्या गुप्तहेराला अटक, भारतीय लष्कराची गोपनीय माहिती थेट पाकिस्तानात, दोन वर्षांपूर्वी...
Mangat Singh
| Updated on: Oct 11, 2025 | 9:59 AM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध इतके जास्त ताणले गेले की, परिस्थिती युद्धाची निर्माण झाली. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत होती. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला भारतावर केला. या हल्ल्यात अनेक पर्यटकांचे जीव गेले. प्रचंड संताप पहलगाम हल्ल्यानंतर भारतात बघायला मिळाला. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी भारताने त्यांच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाकिस्तानमध्ये घुसून भारताने दहशतवादी अड्डे उध्दवस्थ केली. या युद्धात पाकिस्तानचे अनेक विमान भारताने पाडली. परिस्थिती अत्यंत तणावाची होती आणि लष्कराकडून सडेतोड उत्तर पाकिस्तानच्या हल्ल्याला दिले जात होते. मात्र, यावेळी लष्कराची काही गुप्त माहिती पाकिस्तानमध्ये पोहोचवली जात होती.

राजस्थान इंटेलिजेंसने आता मोठी कारवाई करत अलवर येथील रहिवासी मंगत सिंग याला अटक केलीये. ऑपरेशन सिंदूरदरम्यान तो धक्कादायक माहिती पाकिस्तानात पाठवत असल्याचे स्पष्ट झाले. मंगत सिंग हा पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करत होता. त्याला अधिकृत गुपिते कायदा 1923 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याने ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लष्कराची माहिती पाकिस्तानमध्ये पाठवली.

मंगत सिंग हा तब्बल गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानातील दोन नंबरसोबत सतत संपर्कात होता. त्याने अलवर आर्मी कॅन्टोनमेंटसह सैन्याबद्दल महत्त्वाची माहिती पाकिस्तानात पाठवली. तो ही माहिती मोठा पैसा घेऊन पाठवत असत. पाकिस्तानातून त्याच्या नावावर मोठी रक्कम आल्याचे स्पष्ट झालंय. ऑपरेशन सिंदूरनंतर राजस्थान गुप्तचर यंत्रणेने मंगत सिंगच्या हालचालीवर लक्ष ठेवले. अलवर कॅन्टोन्मेंट परिसरात पाळत ठेवताना मंगत सिंग बऱ्याचदा आढळून आला. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात तो होता.

अटक केल्यानंतर मंगत सिंग याच्या मोबाईलमध्ये काही महत्वाची माहिती हाती लागली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात तो आला. आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट दिसून आले आहे की, पाकिस्तानसाठी हेर म्हणून काम करणाऱ्या एजंटने अलवर आर्मी मुख्यालयासह लष्कराच्या विविध क्षेत्रांची माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला पाठवली आहे. यासोबतच चाैकशीमध्ये तो अजून काही खुलासे करण्याची शक्यता आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.