Jyoti Malhotra : सर्वात मोठी कारवाई… हेरगिरी करणारी ज्योती ज्याच्या जीवावर उडायची, तेच पंख छाटले; ट्विस्ट काय?
Jyoti Malhotra : पाकसाठी हेरगिरी करणारी ज्योती खूप आलिशान आयुष्य जगायची. ती व्हॉट्सॲप, टेलीग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मवरून पाकमधील एजंट्सच्या संपर्कात रहायची. इतर कोणाला कळू नये म्हणून ज्योतीने तिच्या मोबाईलमध्ये अनेक पाकिस्तानी लोकांचे नंबर वेगळ्या नावाने सेव्ह केले होते.

पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचा आणि भारताबद्दल संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप असलेल्या हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्राला मोठा झटका बसला आहे. तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. येत्या काही दिवसांत ज्योतीचे यूट्यूब चॅनल देखील ब्लॉक होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी संबंधित लोक युट्यूबर ज्योतीला त्यांचा ‘संपर्क’ म्हणून तयार करत होते. फेसबुक-इंस्टाग्रामची मालकी असलेली कंपनी मेटाने आज अर्थात सोमवारी युट्यूबर ज्योती मल्होत्राचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड केलं आहे. ज्योती मल्होत्रा इन्स्टा, फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटांच्या संपर्कात होती, असा आरोप आहे. ज्योती इंस्टाग्रामवर तिचे ग्लॅमर दाखवायची आणि भरपूर रील्स बनवायची.
एवढंच नव्हे तर 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या एका अधिकाऱ्याच्या संपर्कात होती असेही समोर आलं आहे.
इन्स्टावर किती होते फॉलोअर्स ?
ज्योती मल्होत्रा ही युट्यूब तसेच इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय होती. ज्योती मल्होत्राचे ‘ट्रॅव्हल विथ जो’ हे यूट्यूब चॅनल असून तिथे 3.77 लाख सबस्क्रायबर्सस आहेत. तर इन्स्टाग्रामवर 1.32 लाख फॉलोअर्स आहेत. 2023 साली कमिशन एजंट्समार्फत व्हिसा मिळवून ज्योती ही पाकिस्तानला गेली होती. तिथे त्याची भेट पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली, ज्याला अलीकडेच भारतातून हद्दपार करण्यात आले होते, पोलिस तपासात ही माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी संबंधित लोकांशी थेट संपर्क
ज्योती मल्होत्राला लष्करी किंवा संरक्षण कारवायांशी संबंधित कोणत्याही माहितीबद्दल थेट प्रवेश नव्हता जी तिने शेअर केली असे म्हणता येईल, परंतु ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी संबंधित लोकांशी थेट संपर्कात होती, असे हिसारचे एसपी शशांक कुमार सावन म्हणाले. “पाकिस्तानी एजन्सीजमधील लोक निश्चितच ज्योतीला ‘संपर्क’ म्हणून तयार करत होते. ती (मल्होत्रा) युट्यूबवर सक्रिय असलेल्या इतर ‘प्रभावशाली व्यक्तीं’च्या संपर्कात होती. ते देखील पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी संबंधित व्यक्तींच्या संपर्कात होते.” असेही त्यांनी सांगितलं. हे देखील एका प्रकारे युद्धच आहे, ज्यामझ्ये पराकिस्तानी एजन्सीचे लोक हे इन्फ्लुएन्सरना आपल्यासोबत जोडून त्यांचं नॅरेटिव्ह पुढे चालवण्याचा प्रयत्न करतात, असं पोलिसांनी पुढे नमूद केलं.