Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रा केसमध्ये मोठा ट्विस्ट… आता ही प्रियंका सेनापती कोण?
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या ओळखीच्या लोकांचीही पोलिस चौकशी करत आहेत. आता या प्रकरणात प्रियंका सेनापती नावाच्या एका युट्यूबरचे नावही समोर आले आहे. प्रियांकाशी संबंधित दृष्टिकोनातूनही पोलिस तपास करत आहेत.

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणाच्या हिसारमधील ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. आता या केसमध्ये नवा ट्विस्ट आला असून आणखी एक यूट्यूबर प्रियांका सेनापतीचं नावही समोर येतयं. 16 मे रोजी ज्योतीला हेरगिरीच्या आरोपाखाली बेड्या ठोकण्यात आल्या. प्रियंका ही ज्योती मल्होत्राची साथीदार असल्याने तिची सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे, असं पुरीचे पोलिस अधीक्षक (एसपी) विनीत अग्रवाल म्हणाले. ज्योतीशी असलेले तिचे संबंध आणि कर्तारपूर कॉरिडॉरला तिने केलेल्या प्रवासाची चौकशी एजन्सीकडून करण्यात येत आहे. ज्योती माझी फक्त एक मैत्रीण होती आणि मी तिच्याशी YouTube द्वारे संपर्कात आले, असं प्रियांका सेनापतीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होतं.
तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल मला काहीही माहिती नाही, असं तिने स्पष्ट केलं होतं. ती शत्रू देश पाकिस्तानसाठी हेरगिरी करत आहे, हे जर मला माीत असतं तर मी कधीही तिच्याशी संपर्क साधला नसता. प्रियांकाने पुढे लिहिले की, जर कोणत्याही तपास संस्थेला माझी चौकशी करायची असेल तर मी पूर्ण सहकार्य करेन. माझ्यासाठी राष्ट्र सर्वोच्च आहे. त्यानंतरच इतर सगळं येतं, असं प्रियांकाने नमूद केलं.
प्रियांका सेनापती आहे तरी कोण?
कंटेंट क्रिएटर असलेली प्रियांका ही पुरीची रहिवासी आहे. प्रियांकाचे यूट्यूबवर 14,600 सबस्क्रायबर्स आहेत तर इंस्टाग्रामवर तिचे 20,000 फॉलोअर्स आहेत. ती ओडिशा तसेच देशाच्या इतर भागांमधील तिच्या प्रवासाचे व्हिडिओ देखील पोस्ट करते. 25 मार्च रोजी प्रियांका सेनापतीने तिच्या यूट्यूब चॅनल ‘Prii_vlogs’ वर पाकिस्तानमधील ओडिया गर्ल | करतारपूर कॉरिडॉर मार्गदर्शक | असता तिच्या पाकिस्तान प्रवासाचा ‘ओरिया व्लॉग’ नावाचा व्हिडिओ पोस्ट केला.
पुरीच्या प्रवासादरम्यान ज्योतीशी झाली भेट
ज्योती मल्होत्रासोबतच्या तिच्या नात्यामुळे प्रियांका चर्चेत आली आहे. प्रियंका सेनापती हिने पुरी भेटीदरम्यान ज्योती मल्होत्राला जगन्नाथ मंदिरात नेले होते. प्रियंका सेनापती हिला अद्याप अटक झालेली नाही आणि ती पुरी येथील तिच्या घरीच आहे. गुप्तचर विभागाने ज्योती मल्होत्रा आणि प्रियांकाच्या पाकिस्तान प्रवासाशी असलेल्या संबंधांबद्दल तिची चौकशी केली होती, असे तिच्या वडिलांनी सांगितलं.
Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीने पाकमध्ये घेतलं ट्रेनिंग?; भारतात होतं सिक्रेट मिशन
पण याबाबतीत मला काहीही माहित नाही. अलिकडेच मला कळले की ज्योती मल्होत्राला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, असं प्रियांकाच्या वडिलांनी सांगितलं. माझी मुलगी प्रियांका एक YouTuber आहे आणि ती सप्टेंबर 2024 मध्ये पुरीला आलेल्या ज्योतीच्या संपर्कात आली. ज्योती कुठे थांबली हे मला माहित नाही. ती आमच्या घरी आली नव्हती, असंही त्यांनी नमूद केलं.