कंगना म्हणाली मोदी हेच देश आहेत, निवृत्त IAS अधिकाऱ्याने ट्विटरवरच क्विनचा क्लास घेतला

कंगना रनौतने मोदींवर टीका करण्याला विरोध करताना मोदी हेच देश असल्याचं वक्तव्य केलंय (Narendra Modi news).

कंगना म्हणाली मोदी हेच देश आहेत, निवृत्त IAS अधिकाऱ्याने ट्विटरवरच क्विनचा क्लास घेतला
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 2:20 AM

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होतेय (Corona Virus latest news). कोरोनाने लाखो लोकांना आपल्या कवेत घेतलेत. यातील अनेकांची झुंज अपयशी ठरुन त्यांचा बळी गेलाय. दुसरीकडे देशात ऑक्सिजनसह (Oxygen Crisis in India) काही औषधं आणि कोरोना लसींचा तुटवडा पडलाय. त्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले. मात्र, मोदी समर्थकांनी अशी टीका करण्यावरच आक्षेप घेतलाय. यात आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रनौत आघाडीवर असल्याचं दिसतंय. तिने आता मोदींवर टीका करण्याला विरोध करताना मोदी हेच देश असल्याचं वक्तव्य केलंय (Narendra Modi news). तसेच #भारत_का_वीर_पुत्र_मोदी असा हॅशटॅग वापरला. यावरुन एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याने कंगनाचा चांगलाच क्लास घेतलाय (Kangana Ranaut called PM Modi is nation Ex IAS take class of her on Twitter).

पंतप्रधान मोदींना पाठिंबा देणं हाच धर्म आणि कर्म : कंगना रनौत

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं (Kangana Ranaut news), “तुमच्याकडे जगातील सर्वाधिक लायक नेता असेल तेव्हा तुम्ही स्वतः पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करायला नको. त्यांना पाठिंबा द्या. हाच तुमचा धर्म आणि कर्म आहे.’ यावर निवृत्त सनदी अधिकारी (IAS) सूर्य प्रताप सिंह म्हणाले, ‘कंगनाजी तुम्ही पंतप्रधानांच्या समर्थक आहात की प्रखर विरोधी? कारण अशा स्थितीत त्यांचा शत्रूच त्यांची प्रतिमा बिघडवण्यासाठी आणि बदनामी करण्यासाठी असा ट्रेंड करु शकतो. जेव्हा चारी दिशांना मृतदेह आणि मृतदेहच दिसत आहेत तेव्हा हा ट्रेंड म्हणजे अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात फटाके फोडण्याचा प्रकार आहे. आयोडिन युक्त मीठ खात जा बाळा.’

‘मोदी हेच देश, त्यांचं कौतुक करणं त्यांच्यावर उपकार नाही, तर देशावर उपकार’

कंगनाने या अधिकाऱ्याला उत्तर देताना लिहिलं, “त्या व्यक्तीने आयुष्यभर देशाची सेवा केली आणि त्या बदल्यात त्यांना केवळ राग, द्वेष आणि खोटेपणाच मिळाला. देशाचं नेतृत्व करणाऱ्या अशा व्यक्तीचं मनोबल वाढवणं, त्यांच्या प्रयत्नांची आणि कामाचं कौतुक करणं हा त्यांच्यावर उपकार नाही, तर देशावर उपकार आहे. पंतप्रधान हेच देश आहेत. ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत असा विचार करायचा असेल तर लोकशाहीचं नाटक कशाला? मतदान करुन आपला प्रतिनिधी निवडण्याचं इतकं खर्चिक काम का करायचं? पंतप्रधान देशासाठी वडिलांसारखे आहेत. त्यांच्या हेतूवर संशय घेणं किंवा त्यांच्या पराभवाची इच्छा ठेवणं मुर्खपणा आहे.”

‘कंगनाचे ट्विट लिहिणाऱ्याला 8 वीचं नागरिकशास्त्रही माहिती नाही’

सूर्य प्रताप सिंह यांनी कंगनाच्या या ट्विट्सवर उत्तर देताना तिची चांगलीच शाळा घेतली. ते म्हणाले, “पंतप्रधान हेच देश आहेत?? कंगनाजी, तुमचे ट्विट्स जो कुणी लिहितोय त्याने 8 वीचं नागरिकशास्त्राचं पुस्तकही वाचलेलं नाही. लोकशाही हा शासनाचा असा प्रकार आहे जेथे सर्वोच्च शक्ती ही सामुहिकपणे जनतेच्या हातात असते. जनतेकडेच अंतिम नियंत्रण असतं. कृपया थोडा अभ्यास करा.”

“पुढच्या निवडणुकीत तुम्ही पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करा, तोपर्यंत…”

थांबेल ती कंगना कसली. सिंह यांच्या अभ्यास करण्याच्या सल्ल्यानंतर कंगनाने प्रतिक्रिया देत जनतेचा निर्णय नरेंद्र दामोदर मोदी असल्याचं सांगितलं. ती म्हणाली, “जनतेचा निर्णय नरेंद्र दामोदर मोदी आहे. म्हणूनच ते पंतप्रधान आहेत. जो अभ्यास केल्यावर सर्व माहिती असतं पण काहीच कळत नाही अशा अभ्यासाचा काहीही उपयोग नाही. पुढच्या निवडणुकीत तुम्ही पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न करा तोपर्यंत त्यांना त्यांचं काम करु द्या.”

हेही वाचा :

भारताची आबादी वाढतेय, तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा, कंगना रनौतचा हल्लाबोल!

मुव्ही माफियांच्या भीतीने अक्षय कुमारने केला सीक्रेट कॉल, कंगनाचा अजब दावा

कंगना रनौतला मिळाला जामीन, आता काय असणार जावेद अख्तर यांचे पुढचे पाऊल?

व्हिडीओ पाहा :

Kangana Ranaut called PM Modi is nation Ex IAS take class of her on Twitter

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.