AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या हिजाबमुळेच आम्ही अडचणीत; तुम्ही बुरख्यातच राहा…

हिजाबवर बंदी आणण्यात आली तर मुस्लिम समाजाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

तुमच्या हिजाबमुळेच आम्ही अडचणीत; तुम्ही बुरख्यातच राहा...
| Updated on: Oct 13, 2022 | 5:07 PM
Share

नवी दिल्लीः कर्नाटक हिजाब (karnataka hijab Issue) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) खंडपीठाकडून सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणीआधीच उत्तर प्रदेशातील संभल लोकसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकूर रहमान (Khasdar Shafiqur Rahman Burke)  यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाबद्दल बोलताना ते म्हणाले की, मुलींनी हिजाबमध्येच राहण्याची गरज आहे. मुलींनी हिजाब न घालताच फिरत असतील समाजात भ्रामकपणा वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हिजाबवर बंदी आणण्यात आली तर मुस्लिम समाजाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. आणि त्याचा विपरित परिणामही भोगावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तरीही याबाबत सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपमुळे समाजाचे वातावरण बिघडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावरील बंदी उठवण्यास नकार देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.

त्यानंतर या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाकडून गुरुवारी वेगळा निकाल देण्यात आला. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळून लावल्या होत्या.

हिजाब प्रकरणाचा निकाल देताना न्यायमूर्ती गुप्ता म्हणाले की, या प्रकरणी मतभेद आहेत. हा निर्णय पाहता, उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिका पुढील खंडपीठाच्या स्थापनेसाठी मुख्य न्यायमूर्तींसमोर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या बाबतचा आपला निकाल वाचून दाखवताना न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी सांगितले की, हे मत भिन्न आहेत. मी माझ्या ऑर्डरमध्ये 11 प्रश्न तयार केले आहेत.

यामध्ये पहिले अपील घटनापीठाकडे पाठवायचे की नाही? तर न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी शैक्षणिक संस्थांमधील हिजाब वापरावरील बंदी उठवण्यास नकार देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिका फेटाळूनही लावण्यात आल्या आहेत.

याआधीही खासदार शफीकुर रहमान बुर्क हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले होते. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ते म्हणाले होते की, बाळंतपणाचा संबंध मानवाशी नसून निसर्गाशी आणि अल्लाहशी असल्याचे त्यांनी म्हटले होते.

त्यावेळी ज्यावेळी बाळ जन्मते त्यावेळी त्याच्याय अन्नाचीही व्यवस्था तोच करतो असंही ते म्हणाले होते. खासदार बर्क यांनी योगी सरकारला सल्ला देताना सांगितले की, लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्यापूर्वी राज्य सरकारने मुस्लिमांच्या शिक्षणाची व्यवस्थाही करावी, जेव्हा मुस्लिमांना शिक्षण मिळेल आणि आपला समाज शिक्षित होईल, तेव्हा वाढत्या लोकसंख्येची समस्या दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

तर दुसरीकडे शफीकुर रहमान बर्क यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) वर कारवाई केली गेल्यानंतर मात्र हा अत्याचार सुरु असल्याचे त्यांनी म्हटले होते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.