AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sabarimala Temple Gold Missing : जगप्रसिद्ध शबरीमाला मंदिरातील करोडो रुपयांचं सोनं अचानक गायब, कोर्टाचा मोठा निर्णय, आता थेट…

जप्रसिद्ध अशा शबरीमाला मंदिरात सोन्याची चोरी झाली आहे. करोडो रुपयांचे सोने अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी न्यायालयाने मोठा आदेश दिला आहे.

Sabarimala Temple Gold Missing : जगप्रसिद्ध शबरीमाला मंदिरातील करोडो रुपयांचं सोनं अचानक गायब, कोर्टाचा मोठा निर्णय, आता थेट...
Sabarimala Temple Gold Missing
| Updated on: Sep 18, 2025 | 5:10 PM
Share

Sabarimala Temple Gold Case : शबरीमाला हे केरळमधील जगप्रसिद्ध असे मंदीर आहे. या मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी लोक संपूर्ण देशभरातून केरळला जातात. हे मंदीर म्हणजे एक जागृत देवस्थान असल्याची भक्तांची भावना आहे. त्यामुळेच दरवर्षी या मंदिरात लाखो भक्त दर्शनासाठी येतात. दरम्यान, आता याच मंदिरासंदर्भात संपूर्ण देशात खळबळ माजवणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मंदिरातील सोने रहस्यमय पद्धतीने गायब झाले आहे. या घटनेनंतर आता आश्चर्य व्यक्त केले जात असून उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊ मोठा निर्णय घेतला आहे.

42 किलो सोने मंदिरातून नेले, पण…

शबरीमाला मंदिरातील सोने अचानक गायब झाले आहे. मंदीर प्रशासनाला ही बाब समजताच सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात जाऊन पोहोचले आहे. न्यायालयानेही या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचा आदेश दिला आहे. हे प्रकरण 2019 सालचे आहे. 2019 साली शबरीमाला मंदिरातील गर्भगृहात सोन्याचा मुलामा देण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी साधारण 42 किलो सोने मंदिरातून नेण्यात आले होते.

उरलेले 4.45 किलो सोने गायब झाले

ठरलेल्या नियोजनानुसार गर्भग्रहातील सोन्याच्या प्लेट्सवर नेण्यात आलेल्या 42 किलो सोन्याच्या मदतीने विशिष्ट पद्धतीने सोन्याचा मुलामा (गोल्ट प्लेटिंग) करण्यात येणार होता. सोन्याचा मुलामा दिल्यानंतर त्या सोन्याच्या प्लेट पुन्हा एकदा गर्भगृहात लावल्या जाणार होत्या. नियोजनानुसार या सोन्याच्या प्लेट्स परत मंदिराच्या गर्भगृहात लावण्यातही आल्या. मात्र या प्लेट्सचे वजन केल्यानंतर मंदिरातून नेलेल्या 42 किलो सोन्यापैकी मुलामा देण्यासाठी फक्त 38 किलोच सोने वापरण्यात आल्याचे समोर आले. उरलेले 4.45 किलो सोने गायब झाले होते. त्यामुळेच आता या गायब झालेल्या सोन्याचा शोध घेण्यासाठी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला आहे.

न्यायालयाने नेमका काय आदेश दिला?

न्यायालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गाय झालेली वस्तू पेट्रोल असते तर एकवेळी आम्ही समजून घेतले असते. मात्र 4.45 किलो सोने गायब झाले आहे. सोन्याचे वजन कसे कमी होऊ शकते. शबरीमाला मंदिराबाबतची आस्था आणि श्रद्धा यांच्याशी तडजोड होऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. या तपासाला त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने पूर्ण सहकार्य करावे, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, आता न्यायालयाच्या या आदेशानंतर मंदिरात असलेल्या द्वारपालाच्या मूर्तीं तसेच त्या मूर्तींची रचना यांची तपासणी केली जाणार आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.