अखेर ताजमहालच्या तळघराचं रहस्य उलगडलं , म्हणून 22 खोल्या नेहमी असतात बंद..
जगातील सात आश्चर्यांपैकी एक आणि भारताचा अभिमान असलेला ताजमहाल ही केवळ एक सुंदर इमारत नाही तर रहस्यांचा खजिनाच आहे. ताज पाहण्यासाठी फक्त देशातीलच नव्हे तर परदेशातीलही पर्यटक गर्दी करत असतात. पण प्रेमाचं प्रतीक असलेल्या या ताजमहालची काही रहस्यदेखील आहेत. याच ताजमहालमध्ये एक मोठ्ठ तळघर असून 22 खोल्या बंद असतात. तुम्हाला हे माहीत आहे का ?

जगातील सात आश्चर्यांपैकी एक आणि भारताचा अभिमान असलेला ताजमहाल ही केवळ एक सुंदर इमारत नाही तर रहस्यांचा खजिना देखील आहे. दरवर्षी लाखो पर्यटक भारत आणि परदेशातून प्रेमाचं प्रतीक असलेल्या या पांढऱ्या संगमरवरी इमारतीला पाहण्यासाठी येतात. पण ताजमहालच्या आत एक तळघर आहे जे वर्षानुवर्षे बंद ठेवण्यात आले आहे, हे तुम्हाला माहिती आहे का ? या तळघरात 22 खोल्या आहेत, ज्या सामान्य माणसांपासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत. पण असं का ? काय आहे त्यामागची कहाणी ? चला जाणून घेऊया..
22 खोल्या का असतात बंद ?
या खोल्या बंद ठेवण्यामागे अनेक वैज्ञानिक आणि संरक्षणाशी निगडीत कारणे आहेत.
संगमरवराला धोका :
कार्बन डायऑक्साइडचा संगमरवरावर वाईट परिणाम होतो. जर या खोल्या वारंवार उघडल्या गेल्या किंवा येथे हालचाल झाली तर त्याचा ताजमहालच्या रचनेवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः, आर्द्रता आणि हवेमुळे संगमरवरीाची चमक कमी होऊ शकते.
भिंतींची मजबुती :
ताजमहलच्या तळघराच्या भिंती खूप जुन्या आहेत. त्या वारंवार उघडल्याने भिंतींची ताकद कमकुवत होऊ शकते. म्हणून संरचनेचे संरक्षण करण्यासाठी हे बंद ठेवले जातात.
संरक्षण कार्य:
या खोल्यांची देखभाल आणि दुरुस्तीचे काम फक्त (ASI) एएसआयकडून केले जाते. येथे बाहेरील व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही.
ताजमहलचं तळघर आहे तरी काय ?
ताजमहाल जिथे बांधण्यात आला आहे तिथे त्याच्या खाली एक लांब तळघर आहे ज्यामध्ये 22 स्वतंत्र खोल्या आहेत. हे तळघर मुख्य इमारतीच्या मागील बाजूस आहे, जे सर्वसामान्यांसाठी बंद असते. या खोल्यांमध्ये नियमित हालचाल होत नाही किंवा पर्यटकांना त्याबद्दल माहिती दिली जात नाही.
शेवटचं कधी उघडलं होतं तळघर ?
इतिहासात अशी नोंद आहे की ताजमहालचां तळघर हे शेवटचं,1934 साली उघडण्यात आलं होतं. तेव्हापासून ते फक्त भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) कडून तपासणी आणि दुरुस्ती दरम्यान उघडले जाते. सामान्य लोकांना येथे जाण्याची परवानगी नाही.
या खोल्यांबद्दल लोकांचं मत काय ?
सोशल मीडियावर आणि काही लेखांमध्ये अनेक वेळा असा दावा करण्यात आला आहे की या खोल्यांमध्ये ऐतिहासिक गुपिते लपलेली आहेत किंवा तिथे असे काहीतरी ठेवले आहे जे सरकार जगापासून लपवू इच्छिते. पण तिथे असं काहीच नाहीये हे एएसआय आणि तज्ञांनी वारंवार स्पष्ट केलं आहे. ही फक्त पुरातत्वीय सुरक्षितता आणि संवर्धनाची बाब असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
पुन्हा कधी उघडणार या खोल्या ?
सध्या या खोल्या पुन्हा उघडण्याची कोणतीही योजना नाही. ASIचा असं मानणं आहे की, त्यांची स्थिती तशीच ठेवणं चांगलं आहे. या खोल्या कोणंतही नुकसान झाल्याशिवाय उघडता येतील,असं काही तंत्रज्ञान भविष्यात विकसित झालं तर कदाचित हे खोल्या पुन्हा सामान्य लोकांसाठी उघडता येतील.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. आमचा याला दुजोरा नाही.)
