लालू प्रसाद यादवांनी नव्या सूनबाईचं नाव बदललं; तेजस्वी यादवांच्या पत्नीचं नवं नाव नेमंक काय?

लालू प्रसाद यादवांनी नव्या सूनबाईचं नाव बदललं; तेजस्वी यादवांच्या पत्नीचं नवं नाव नेमंक काय?
tejashwi yadav married

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे चिरंजीव तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी 9 डिसेंबरला हवाई सुंदरी अ‍ॅलेक्सिसशी (Alexis Rachel) हिच्याशी विवाह केला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Dec 11, 2021 | 2:20 PM

नवी दिल्ली: राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे चिरंजीव तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी 9 डिसेंबरला हवाई सुंदरी अ‍ॅलेक्सिसशी (Alexis Rachel) हिच्याशी विवाह केला आहे. लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या नव्या सुनेच दुसरं नाव राजश्री ठेवलं आहे. तेजस्वी यादव यांची पत्नी आता राजश्री यादव (Rajshree Yadav ) या नावानं ओळखली जाईल. अ‍ॅलेक्सिस रचेल हिला राजश्री हे नाव लालूप्रसाद यादव कुटुंबानं दिलं आहे. तर, दुसरीकडे तेसस्वी यादव यांनी ख्रिश्चन मुलीशी लग्न केल्यानं काही नातेवाईकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.

राजश्री हे नाव लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवींना आवडलं

तेजस्वी यादव यांनी अ‌ॅलेक्सिस रचेल हिच्याशी 9 डिसेंबरला बहीण मिसा भारतीच्या फार्महाऊसवर मोजक्याच आप्तेष्टांच्या उपस्थित विवाह केला होता. यादव कुटुंबामध्ये अ‌ॅलेक्सिस यांना राजश्री या नावानं ओळखलं जाणार आहे. अ‌ॅलेक्सिस या ख्रिश्चन असून यादव कुटुंबानं त्यांना हिंदू धर्माशी संबंधित असणार नाव द लिं आहे.

मामा भडकले

तेजस्वी यादव यांनी ख्रिश्चन मुलीशी लग्न केल्यानंतर लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबानं तिचं नाव राजश्री ठेवलंय. मात्र, तेजस्वी यादव यांचे मामा भडकले आहेत. ख्रिश्चन मुलीशी लग्न करुन तेजस्वी यादव यानं समाजाला कलंक लावल्याचं साधू यादव म्हणाले आहेत. साधू यादव यांनी अशा गोष्टी आपला यदूवंशी समाज अशा गोष्टी स्वीकारत नाही, असं म्हटलं आहे.

मतं यादव समाजाची आणि लग्न ख्रिश्चन मुलीशी

साधू यादव यांनी तेजस्वी यादव यांच्यावर हल्ला चढवला आहे. आमच्या भाच्याला निवडणुकीत यादवांची मत हवी असतात. मात्र, यादव समाजातील मुलीशी लग्न करायला नको, असं साधू यादव म्हणाले. यादवांची मतं हवी आहेत मात्र लग्न ख्रिश्चन मुलीशी करणार असतील तर तेजस्वी यादव यानं चंदीगढ किंवा केरळला जाऊन मत मागावीत, असं वक्तव्य साधू यादव यांनी केलं आहे. तेजस्वी यादव यांचं बिहारमध्ये काही राहिलेलं नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे.

अ‍ॅलेक्सिस काय करते?

अ‍ॅलेक्सिस ही दिल्लीच्या वसंत विहारची राहणारी आहे. ती पूर्वी एअरहोस्टेस होती. तिचे वडील चंदीगडच्या एका शाळेत प्रिन्सिपल होते. तेजस्वी आणि अ‍ॅलेक्सिस एकमेकांना गेल्या सहा वर्षापासून डेट करत होते.

इतर बातम्या:

बहिणीच्या फार्म हाऊसवर तेजस्वी यादव यांनी घेतले सातफेरे; हवाईसुंदरी असलेल्या सूनेवर लालू नाराज का?

तीन दिवसाच्या घसरणीनंतर काय आहेत सोयाबीनचे दर ? नव्या तुरीचीही बाजारात आवक सुरु

 

Lalu Prasad Yadav changed name of younger daughter in law wife of Tejashwi Yadav alexis rachel to Rajshree Sadhu Yadav angry

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें