मुलाच्या घटस्फोटाचं टेन्शन, लालू डिप्रेशनमध्ये!

नवी दिल्ली : यादव कुटुंबात सुरु असलेल्या वादाचा परिणाम राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या तब्येतीवर झाला आहे. ते सध्या रांचीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. येथील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लालू प्रसाद यादव यांना झोप लागत नाही, त्यांची डिप्रेशन लेव्हल वाढली आहे. मुलगा तेजप्रताप आणि सून ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाचं टेन्शन लालू प्रसाद यादव यांनी घेतल्याचे बोलले […]

मुलाच्या घटस्फोटाचं टेन्शन, लालू डिप्रेशनमध्ये!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

नवी दिल्ली : यादव कुटुंबात सुरु असलेल्या वादाचा परिणाम राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या तब्येतीवर झाला आहे. ते सध्या रांचीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. येथील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लालू प्रसाद यादव यांना झोप लागत नाही, त्यांची डिप्रेशन लेव्हल वाढली आहे. मुलगा तेजप्रताप आणि सून ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाचं टेन्शन लालू प्रसाद यादव यांनी घेतल्याचे बोलले जात आहे.

अनेक आजारांनी लालूंना घेरले!

लालूंना रात्र-रात्र झोप लागत नसल्याने तब्येतीवर थेट परिणाम होत आहे. त्यात गेल्या काही काळापासून लालूंना मधुमेहाचा त्रास आहे. त्यातच आता किडनीचा त्रासही सरु झाला आहे. किडनी केवळ 50 टक्केच कार्यरत आहे. शिवाय, अनेक बारीक-सारिक आजारांनी लालूंना घेरले आहे. अनेकदा चालता-चालता किंवा बसल्या जागी त्यांना चक्कर येते. एकंदरीत लालूंच्या तब्येत सुधरत नसताना, त्यात मुलाच्या घटस्फोटाचं प्रकरण समोर आलं. त्यामुळे लालू प्रसाद यादव आता डिप्रेशनमध्ये गेल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

तेजप्रताप-लालू भेट

घटस्फोटाच्या निर्णयानंतर तेजप्रताप यादव रांचीमध्ये येऊन, लालू प्रसाद यादव यांनी भेटून गेले. या भेटीत लालूंनी मुलाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, आपण निर्णयावर ठाम असल्याचे तेजप्रतापने लालूंना सांगितले. या भेटीनंतर तेजप्रताप यांनी कुटुंबीयांवर सुद्धा आपल्याविरोधात कट रचल्याचा आरोप केला.

कुटुंबही ऐश्वर्याच्या बाजूने, तेजप्रतापचा आरोप

दुसरीकडे, यादव कुटुंबीय मात्र सून ऐश्वर्या हिच्या बाजूने उभे राहिले असून, तेजप्रतापला समजावण्याचे प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात बोलताना तेजप्रताप म्हणाले की, “घरातील सर्वजण, भाऊ-बहीण, आई-वडील ऐश्वर्याच्या बाजूने आहेत. मात्र, मीही माझ्या निर्णयावर ठाम आहे. मला कुणी अडवू शकत नाही.”

तसेच, “माझ्याविरोधात कट रचला जात आहे आणि त्यात माझे कुटुंबीय सुद्धा सहभागी आहेत. दीड महिन्यांपासून ऐश्वर्याशी माझं बोलणं झालं नाही आणि आता अचानक ती घरात येऊ पाहतेय. तिला कुटुंबीयांचा पाठिंबा आहे.”, असे तेजप्रताप म्हणाले.

मे महिन्यात लग्न, सहा महिन्यात घटस्फोट

लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची नात ऐश्वर्या यांचं मे महिन्याच्या 12 तारखेला लग्न झालं. लग्नाला सहा महिनेही पूर्ण होत नाहीत, तोच तेजप्रताप याने ऐश्वर्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे यादव कुटुंबीयांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, तेजप्रताप यांना समजावण्याचे मोठे प्रयत्न केले जात असतानाही, ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.