AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी | लोकसभा निवडणुकीचं देशात पहिल्यांदा ‘या’ लोकांच्या घरोघरी मतदानाची सोय, निवडणुक आयुक्तांची घोषणा

लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून निवडणुक आयोगाने महत्त्वाची माहिती दिली आहे. यंदा पहिल्यांदाच संपूर्ण देशात घरोघरी जाऊन मतदार होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मोठी बातमी | लोकसभा निवडणुकीचं देशात पहिल्यांदा 'या' लोकांच्या घरोघरी मतदानाची सोय, निवडणुक आयुक्तांची घोषणा
| Updated on: Mar 16, 2024 | 4:20 PM
Share

नवी दिल्ली | यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशात 97 कोटीहून अधिक मतदार आहेत. त्यात 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. यंदा 82 लाख प्रौढ मतदार मतदान करणार आहेत. 48 हजार तृतीयपंथीयही मतदान करणार असल्याची माहिती दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये देशात पहिल्यांदाच घरोघरी मतदानाची सोय केल्याची घोषणा केली आहे.

या लोकांचं घरोघरी जाऊन होणार मतदान

मतदारांमध्ये यंदा 82 लाख मतदार हे 85 वर्षांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे ज्यांना पोलिंग बुथवर येऊ न शकणाऱ्यांसाठी घरोघरी जाऊन मतदान करून घेण्याची सोय करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध असणार आहे. जास्तीत जास्त आणि प्रत्येकाने मतदान करावं यासाठी आम्ही ही मेहनत घेत आहोत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या  घराजवळ असणाऱ्या पोलिंग बुधवर मतदान करावं, असं राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. यासाठी एक फॉर्म देण्यात येणार आहे तो भरावा लागणार आहे.

आमच्या टीममधील प्रत्येकाला ट्रेनिंद देण्यात आलं आहे. जंगल, बर्फ, नदी ते घोड्याने, हत्तीवर किंला हेलिकॉप्टरने ते सर्वत्र जाणार आहेत. कारण प्रत्येकाला मतदान करता यावं, यासाठी आम्ही पूर्म तयारी केल्याचं राजीव कुमार म्हणाले.

ही निवडणूक म्हणजे आमच्यासाठी ऐतिहासिक संधी असणार आहे. देशातील निवडणूक म्हणजे 1 सण असतो, जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. 17 व्या लोकसभेची मुदत संपत आहे. प्रत्येक मतदान म्हणजे आमची चाचणी असते. आम्ही जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी राजकिय पक्ष यांच्याशी संवाद साधला आहे, ही निवडणूक निःपक्ष पणे होईल, असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  2019 च्या लोकसभा निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान 7 टप्प्यात पार पडल्या होत्या. तर 23 मे रोजी निकाल लागला होता. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा 5 मार्च रोजी जाहीर झाल्या होत्या. 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीत 9 टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.