AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी संसदेत भारतावर कौतुकाचा वर्षाव, भारतात लाखो पोलिंग बूथ, महिनाभर प्रक्रिया, कुठेही गोंधळ नाही…

Lok Sabha Elections 2024: पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी निवडणूक झाली. परंतु त्यापूर्वीच सरकार कोणाची येईल, हे स्पष्ट झाले होते. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची लाट संपूर्ण पाकिस्तानात होती. निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बंदी घालण्यात आली होती.

पाकिस्तानी संसदेत भारतावर कौतुकाचा वर्षाव, भारतात लाखो पोलिंग बूथ, महिनाभर प्रक्रिया, कुठेही गोंधळ नाही...
pakistan parliament
| Updated on: Jun 13, 2024 | 3:27 PM
Share

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया भारतात यशस्वी झाली. भारतीय निवडणूक पाहण्यासाठी देशातील नाही तर विदेशातील माध्यमे आणि विश्लेषक आले होते. सर्वांकडून भारतीय निवडणूक प्रक्रियेचे कौतूक करण्यात आले. परंतु नेहमी भारताविरोधी भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानमध्येही भारताचे कौतुक झाले. पाकिस्तानच्या संसदेत भारताने राबवलेल्या निवडणूक प्रक्रियेचे कौतूक करताना पाकिस्तानात काय सुरु आहे, त्यासंदर्भातील आरसाही दाखवला.

पाकिस्तानात विरोधकांकडून भारताचे झाले कौतुक

पाकिस्तान संसदेत भारतीय निवडणुकी प्रक्रियेचे गौरव करण्यात आले. पाकिस्तान निवडणूक प्रक्रियेत गोंधळ अन् हेराफेरीचे आरोप होत आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या संसदेत बोलताना एका खासदाराने भारताच्या निवडणुकीचे कौतुक केले. त्यांनी पाकिस्तानच्या निवडणूक पद्धतीवर टीका करत भारतात निवडणुकांना एक महिना लागला असल्याचे सांगितले. आपण फक्त लढत राहतो. आपल्या निवडणुकीचे निकाल स्वीकारत नाही.

पाकिस्तानकडून ईव्हीएमचे कौतुक

पाकिस्तानमधील विरोधी पक्षाचे खासदार शिबली फराज यांनी भारतीय निवडणुकीचे कौतुक करताना पाकिस्तानमधील राजकीय पक्षांना आरसा दाखवला. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये ईव्हीएमद्वारे एकाचवेळी किती काळ निवडणुका घेतल्या जातात, ते त्यांनी सांगितले. ८० कोटी लोकांनी मतदान केले. भारताने ईव्हीएमद्वारे ही निवडणूक पार पाडली. एका व्यक्तीसाठी त्यांनी मतदान केंद्र उभारले. भारतीय निवडणुकांमध्ये कुठेही फसवणुकीचा आरोप झाला नाही. सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली, अशी प्रशंसाही त्यांनी भारताची केली. पाकिस्तान हे का करू शकत नाही, असा सवालही त्यांनी केला. आम्ही त्या प्रक्रियेसारखी प्रक्रियेत सहभाग घेऊ इच्छितो.

पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी निवडणूक झाली. परंतु त्यापूर्वीच सरकार कोणाची येईल, हे स्पष्ट झाले होते. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची लाट संपूर्ण पाकिस्तानात होती. निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बंदी घालण्यात आली होती. 8 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिये दरम्यान मोबाईल सेवा बंद करण्यात आली होती. अनेक ठिकाणी हिसांचार झाला होता. निवडणूक निकाल जाहीर करण्यास उशीर झाला. यामुळे हेराफेरी झाल्याचा आरोप होत आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.