दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरात मॉक ड्रिल, भाविकांना दाखवलं युद्धापासून बचावाचं प्रात्यक्षिक
दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरात देखील मॉक ड्रील करण्यात आलं आहे. मंदिर प्रशासन, दिल्ली पोलीस आणि आपत्कालीन पथक यांच्या माध्यमातून दिल्लीच्या स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरात मॉक ड्रील करण्यात आलं.

भारतानं पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे, मंगळवारी मध्यरात्री भारतानं पाकिस्तानमध्ये घूसून एअर स्ट्राईक केला या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीरमधील 5 तर पाकिस्तानमधील चार दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या एअर स्ट्राईकमध्ये जवळपास 100 दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे, ऑपरेश सिंदूर असं या मिशनला नाव देण्यात आलं होतं. दरम्यान ऑपरेशन सिंदूर नंतर गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार भारतातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मॉक ड्रिल करण्यात आलं. युद्धाच्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी आपला बचाव कसा करावा, याचं प्रात्यक्षिक या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना दाखवण्यात आलं.
दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरात देखील मॉक ड्रील करण्यात आलं आहे. मंदिर प्रशासन दिल्ली पोलीस आणि आपत्कालीन पथक यांच्या माध्यमातून दिल्लीच्या स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरात मॉक ड्रील करण्यात आलं. मॉक ड्रिलदरम्यान अक्षरधाम मंदिरातील सर्व दिवे बंद करण्यात आले, त्यानंतर हळूहळू मंदिरातील दिवे प्रज्वलित करण्यात आले. युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा हवाई हल्ला झाल्यास स्वत:च संरक्षण कसं करावं? अशा परिस्थितीमध्ये काय करावं याचं प्रात्यक्षिक भाविकांना दाखवण्यासाठी अक्षरधाम मंदिरात मॉक ड्रील घेण्यात आलं. आम्ही भाविकांच्या सुरक्षिततेसाठी वचनबद्ध आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली.
#WATCH दिल्ली: मॉक ड्रिल के तहत ब्लैकआउट के बाद अक्षरधाम मंदिर में धीरे-धीरे लाइटें जलाई गईं। pic.twitter.com/kfQDJzHC1k
— ANI_HindiNews (@AHindinews) May 7, 2025
गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या सूचनेनुसार दिल्ली, मुंबईसह देशभरातली अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये आज मॉक ड्रिल करण्यात आलं, मॉक ड्रिलदरम्यान दिल्लीमध्ये पूर्ण ब्लॅक आउट करण्यात आलं होतं, तर मुंबईमध्ये देखील मॉक ड्रिल करण्यात आलं. मुंबईतील क्रॉस मैदान आणि सीएसएमटी येथे मॉक ड्रिल घेऊन नागरिकांना हवाई हल्ल्यापासून बचावाचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. मुंबईप्रमाणेच बंगळुरू, जयपूर आणि पुण्यात देखील मॉक ड्रील घेण्यात आलं. जर देशात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर स्वत:चा बचाव कसा करायचा? हवाई हल्ला झाला तर संरक्षण कसं करायंच याचं प्रात्यक्षिक या मॉक ड्रिलच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना दाखवण्यात आलं आहे.
