AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या दिवशी मॉक ड्रिल, त्याच दिवशी…भारतीय एअर फोर्सचा अचानक मोठा निर्णय, पाकिस्तानला…

कोणत्याही क्षणी पाकिस्तानविरोधात युद्ध चालू होण्याची शक्यता लक्षात घेता संपूर्ण भारतात 7 मे रोजी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या दिवशी मॉक ड्रिल, त्याच दिवशी...भारतीय एअर फोर्सचा अचानक मोठा निर्णय, पाकिस्तानला...
indian air force
| Updated on: May 07, 2025 | 12:23 AM
Share

Mock Drill : पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही क्षणी पाकिस्तानविरोधात युद्ध चालू होण्याची शक्यता लक्षात घेता संपूर्ण भारतात 7 मे रोजी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. युद्धात नागरिकांनी स्वत:ची काळजी कशी घ्यायची, यासाठी ही मॉक ड्रिल आयोजित केली जाणार आहे. दरम्यान, याच दिवशी एकीकडे मॉक ड्रिल चालू असताना दुसरीकडे भारताचे वायू दल मोठी कामगिरी करणार आहे. वायू दलाच्या या निर्णयाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पाकिस्तानच्या सीमेवर होणार युद्धाभ्यास

मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या वायू दलाने एक NOTAM जारी केला आहे. या NOTAM नुसार भारताचे हवाई दल येत्या 7 मे रोजी युद्धाभ्यास करणार आहे. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तानच्या सीमेवरच हा युद्धाभ्यास चालू होणार आहे. भारत-पाकिस्तानच्या दक्षिणी सीनेवर वायूदलाची वेगवेगळी लढाऊ विमानं आकाशात घिरट्या घालणार आहे. या सीमाभागात वाळवंटाचे क्षेत्र असलेल्या ठिकाणी हा युद्धाभ्यास केला जाईल. वायू दलाने दिलेल्या माहितीनुसार राफेल, मिराज 2000 आणि सुखोई-30 यासारख्या अत्याधुनिक विमानांचा या युद्धाभ्यासात समावेश असेल. सीमाभागातील अनेक जिल्ह्यांत हा युद्धाचा अभ्यास केला जाणार आहे.

NOTAM म्हणजे नेमकं काय असतं?

NOTAM याचा अर्थ नोटीस टू एअर मिशन सिस्टम असा होतो. या नोटिशीच्या माध्यमातून पायलट, ट्रॅफिक कंट्रोलर यांच्यासाठी एक संभाव्य धोक्यांची माहिती देणारी सूचनाच असते. युद्धाभ्यास करताना कोणतीही अडचण येऊ नये त्यामुळे NOTAM च्या माध्यमातून सूचना दिली जाते. नोटमला आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाण अधिनयांच्या अधीन राहूनच जारी केलं जातं.

याच दिवशी देशभरात होणार मॉक ड्रिल

दरम्यान, एकीकडे वायूसेनेचा युद्धाभ्यास चालू असताना देशात याच दिवशी साधारण 295 जिल्ह्यांत मॉक ड्रिल केले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अधिसूचना दिल्या आहेत. पाकिस्तानसोबतची संभाव्य युद्धाची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या मॉक ड्रिलच्या दरम्यान नागरिकांना युद्धात कशी काळजी घ्यायची याचे प्रात्यक्षिक करून दाखवले जाईल. तसेच या दिवशी रेड सायरनही वाजवले जाईल. सोबतच मॉक ड्रिलदरम्यान ब्लॅकआऊटही केले जाणार आहे.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.