AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या फुटीर खासदारांना पंतप्रधानांनी दिला मोठा धीर; पार्थ पवारांना मराठीत काय विचारलं? आतली बातमी समोर

पंतप्रधान मोदींनी ठाकरे आणि ममता गटातील फुटीर खासदारांशी संवाद साधला. एनडीए एक कुटुंब असून, चिंता करू नका, असा धीर त्यांनी दिला. खासदारांनी संसदेतील कामकाजात सक्रिय सहभाग घेऊन, राज्यांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

त्या फुटीर खासदारांना पंतप्रधानांनी दिला मोठा धीर; पार्थ पवारांना मराठीत काय विचारलं? आतली बातमी समोर
PM Narendra ModiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 07, 2026 | 1:05 PM
Share

ठाकरे गटाचे सहाही फुटीर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या फुटीर खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व खासदारांना धीर दिला. तुम्ही चिंता करू नका. मी तुमच्यासोबत आहे. एनडीए हे एक कुटुंब आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खासदारांना धीर दिला. तसेच त्यांना संसदेत होणाऱ्या चर्चांमध्ये भाग घेण्याचा सल्लाही दिला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी राज्यसभेवर निवडून आलेल्या एनडीएच्या खासदारांशीही संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएतील घटक पक्षांच्या सुमारे 45 खासदारांशी नाश्त्यावर संवाद साधत संसदेचे कामकाज सुरळीत चालण्यावर भर दिला. बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षासह विविध एनडीए घटक पक्षांचे खासदार उपस्थित होते. तसेच एनडीए हे एक कुटुंब असल्याचं त्यांना सांगितलं. आम्ही मित्र पक्षांच्या सोबत आहोत. तुम्ही संसदेतील चर्चांमध्ये भाग घ्या. संसदेचा इतिहास वाचा. संसदेला, संसदेच्या कामकाजाला समजून घ्या. संसदेच्या इतिहासाबाबतचं खूप मटेरियल आहे. चर्चेत भाग घेण्यासाठी या मटेरियलचा उपयोग करून घ्या, असं सांगतानाच आपल्या राज्याच्या विकासासाठी काम करा. राज्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल, असं पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं.

मी तुमच्यासोबत

तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. मी तुमच्यासोबत आहे, असं मोदी म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून शिंदे गटात आलेल्या खासदारांना मोदींनी धीर दिला. एनडीएमध्ये प्रत्येक व्यक्तीचा सन्मान केला जातो. सर्वांना संधी दिली जाते. आम्ही एनडीएच्या केवळ एखाद्या मित्र पक्षाच्या नाही तर प्रत्येक खासदारांच्या पाठी आहोत. तुम्हाला कुणाची चिंता करण्याची गरज नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गोंधळावर चिंता

संसद ही लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असून तिचे कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, संसदेत सुरू असलेल्या गोंधळाबाबत चिंता व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, वारंवार होणाऱ्या गदारोळामुळे नव्याने निवडून आलेल्या खासदारांना सभागृहात बोलण्याची संधी मिळत नाही, हा त्यांच्यावर अन्याय आहे. संसद सुरळीत चालावी यासाठी सरकारने विरोधकांशीही चर्चा केली असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, गोंधळामुळे ना विरोधी पक्षांच्या सदस्यांना बोलण्याची संधी मिळत आहे, ना सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना, असंही त्यांनी सांगितलं.

वैयक्तिक विचारपूस

पंतप्रधानांनी खासदारांना आपल्या मतदारसंघातील विकासकामांना गती देण्याचे आवाहन केले. कोणत्याही विकासकामासाठी थेट पंतप्रधान कार्यालयाशी (PMO) संपर्क साधण्यास सांगितले. प्रत्येक खासदाराशी त्यांनी वैयक्तिक संवाद साधत त्यांची विचारपूस केली. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या योगाभ्यासाबाबतही त्यांनी विशेष चौकशी केली. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.

पार्थ पवारांशी मराठीत संवाद

यावेळी मोदींनी बैठकीवेळी एनसीपी नेते पार्थ पवार यांच्याशी एकांतात चर्चा केली. यावेळी त्यांनी आई कशी आहे? त्यांची काळजी घ्या, अशी विचारणा मोदींनी केली. यावेळी मोदींनी पार्थ पवारांकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रकृतीची मराठीत विचारपूस केली.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...