लाडका जावई आला, सासूने दिली झणझणीत चिकनची पार्टी, कोंबडा खाताच दोघांचा गेम, ताटावर बसलेल्या तिघांचं काय झालं? काय होतं त्यात?
जावयाच्या आगमनानंतर घरी खास मेजवानी आयोजित करण्यात आली होती. चिकन आणि दारू देण्यात आली, परंतु ही पार्टी झाल्यावर आनंदाचं वातावरण क्षणात झाकोळलं.. तिथे नेमकं काय घडलं ?

छत्तीसगडमधील कोरबा येथे, एका कुटुंबाला चिकन खाणे आणि चिकन पार्टी करणे महागात पडले. कुटुंबाने चिकन खाल्ल्याबरोबर सर्वांची तब्येत बिघडू लागली. उलट्या आणि जुलाब झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सासू आणि जावयाचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील अन्य तिघांची तब्येत अजूनही गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना राजगमार पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कोरकोमा गावात घडली. जावयाच्या आगमनानंतर घरी खास मेजवानी आयोजित करण्यात आली होती. चिकन आणि दारू देण्यात आली, परंतु ही पार्टी सर्वांसाठी जीवन-मरणाचा प्रश्न बनली. तपासात हे फूड पॉयझनिंगचे प्रकरण असल्याचे उघड झाले. पार्टीत देण्यात आलेली दारू ती देखीर विषारी होती असे म्हटले जात आहे. मात्र, या मृत्यूंचे खरे कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच कळेल.
मिळालेल्या माहितीनुसार, 60 वर्षांच्या राजमीन बाई शिवनगर चौहान पारा येथे राहतात. गुरुवारी रात्री राजमीन बाई यांचे जावई देव सिंह त्यांच्या पत्नी चमेलीसोबत घरी आले. ते भैस्मा दादर कला येथील रहिवासी आहेत. त्यांच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी राजमीन बाई, मुलगा राजकुमार आणि शेजारी राजराज यांनी एकत्र चिकन पार्टी केली. मात्र, ते खाल्ल्यानंतर सर्वप्रथम सासू राजमीनबाई यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर जावयाची प्रकृती बिघडली. दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. उरलेल्या तिघांची प्रकृती गंभीर आहे.
स्ट्रीट फूडमुळे 3 डझन लोक आजारी
दोन दिवसांपूर्वी, उत्तर प्रदेशातील बिजनौरमधील नजीबाबाद भागातील कनकपूर कला गावात एका गाडीवर विकला जाणारा चाट खाल्ल्याने 3 डझनहून अधिक लोक आजारी पडले. संध्याकाळी उशिरा, लोकांनी उलट्या आणि जुलाबाची तक्रार केल्यानंतर त्यांना नजीबाबाद सामीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
चाट खाऊन उलट्या, त्रास
आजारी गावकऱ्यांनी सांगितले की गावात विकला जाणारा चाट खाल्ल्यानंतर काही तासांतच गावकरी आणि मुलांना उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारी येऊ लागल्या. रात्री उशिरापर्यंत आजारी लोकांची संख्या वाढू लागली. गावप्रमुखांनी याची माहिती पोलिसांना दिली. हे कळताच, पोलीस गावात पोहोचले आणि उलट्या आणि जुलाबाने ग्रस्त असलेल्या मुलांना तात्काळ सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार सुरू केले.
