PM नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘नमो के नाम रक्तदान’ मोहीम, विक्रमी 56 हजार युनिट रक्त जमा
भारताने दहशतवादाविरोधात राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे आणि पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुजरातमध्ये 'नमो के नाम रक्तदान' या मोहिमेचे आयोजन कण्यात आले होते. यात विक्रमी रक्त जमा झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. अशातच भारताने दहशतवादाविरोधात राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे आणि पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुजरातमध्ये ‘नमो के नाम रक्तदान’ या मोहिमेचे आयोजन कण्यात आले होते. या मोहिमेला संपूर्ण राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत विक्रमी 56,265 युनिट रक्त जमा झाले आहे. हा एक विक्रम आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
गुजरात सरकारमधील मंत्री हर्ष संघवी यांनी सोशल मीडियावर ‘नमो के नाम रक्तदान’ या मोहिमेची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं की, “भारतातील एक ऐतिहासिक क्षण! ऑपरेशनसिंदूर आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी ‘नमो के नाम रक्तदान’ या कार्यक्रमासह जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी 378 मेगा रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत, ज्यामध्ये 56,265 युनिट रक्त जमा झाले आहे. भारतीय इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तदान मोहीम आयोजित केली होती.”
A historic moment in India! 🇮🇳 On the success of #OperationSindoor and Honourable PM @narendramodi Birthday, State Government employee unions have set a world record with ‘Namo ke naam raktdan’. They organized 378 mega blood donation camps, collecting a massive 56,265 units of… pic.twitter.com/B0DM4Wqkzv
— Harsh Sanghavi (@sanghaviharsh) September 16, 2025
या मोहिमेत 75 हजार कामगार, 4000 रक्तपेढ्या, 5000 डॉक्टर, 1 लाखाहून अधिक स्वयंसेवक आणि 3 लाखांहून अधिक रक्तदात्यांनी भाग घेतला होता. अलिकडच्या ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर, मोठ्या संख्येने रक्त गोळा करणे आणि गरिबांना मदत करणे या उद्देशाने पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त ही महा रक्तदान मोहीम आयोजित करण्यात आली होती.
सूरतमधील उधना येथील आर.एन. नायक हायस्कूलमध्येही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. स्थानिक नगरसेवक आणि सुरत परिवहन समितीचे अध्यक्ष सोमनाथभाई मराठे यांच्या हस्ते सकाळी 10:30 वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राधेश्यामभाई शुक्ला, किशोरभाई ठक्कर, शाळेचे मुख्याध्यापक अनंतकुमार नायक, एसव्हीएस समन्वयक गिरीशभाई पटेल, दक्षाबेन ख्रिश्चन आणि प्राचीबेन देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात शाळेचे मुख्याध्यापक अनंतकुमार नायक आणि एसव्हीएस समन्वयक गिरीशभाई पटेल यांनी स्वतः रक्तदान केले. दुपारी 4 वाजेपर्यंत 371 लोकांनी रक्तदानासाठी नोंदणी केली होती. या शिबिरात 71 युनिट रक्त जमा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
