विदर्भातील 5-6 जागांवर वाद, उद्या संध्याकाळी आम्ही…; आघाडीतील नेत्याचं विधान चर्चेत

Vijay Wadettiwar on Thackeray Group Congress Dispute : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीतील वादावर भाष्य केलं आहे. आज दिल्लीत काँग्रेसची बैठक झाल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. जागावाटप कधी जाहीर होणार? हे देखील त्यांनी सांगितलं. वाचा सविस्तर...

विदर्भातील 5-6 जागांवर वाद, उद्या संध्याकाळी आम्ही...; आघाडीतील नेत्याचं विधान चर्चेत
विजय वडेट्टीवार, नेते काँग्रेसImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 1:27 PM

महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली. हिमाचल भवनात काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्राच्या जागावाटपावर चर्चा झाली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. जागावाटपावरून महाविकास आघाडीत वाद आहेत. विशेषत: विदर्भातील काही जागांवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सेखेच सुरु आहे. या महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या तिढ्यावर वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या जागांचा तिढा सुटलेला असेल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

जागावाटपावर काय म्हणाले?

महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा संपल्यात जमा आहे. 15-16 जागांची चर्चा बाकी आहे. 7-8 जागा आमच्यात बदलायच ठरवलं आहे. जागावाटपबाबत महायुतीच्या नेत्यांनी देव पाण्यात बुडू ठेवले असतील तर ते स्वप्नात आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या जागांचा तिढा सुटलेला असेल. उद्या संध्याकाळी आम्ही जागा जाहीर करून पुढे गेलेले असू. काही प्रमाणात थोडीफार नाराजी असतेच… त्यांची आम्ही समज घालू आणि आघाडी म्हणून एकत्र लढू. तिन्ही पक्षांचा 17 जागांचा तिढा आहे. तो उद्या रात्रीपर्यंत सुटेल. विदर्भात 5-6 जागांवर आमचा वाद आहे. तो देखील सुटेल, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

ठाकरे गट- काँग्रेसमधील वादावर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

काल आम्ही हायकमांडसोबत चर्चा करून माहिती दिली. मार्ग कसा काढायचा यावर देखील त्यांच्याशी आम्ही बोललो. 90 जागा घेऊन आम्ही आज CEC मध्ये जात आहोत. आज रात्री किंवा उद्या सकाळी आमची यादी येईल. विदर्भात 5-6 जागांवर आमचा वाद आहे… तो देखील सुटेल, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीसाठी महाराष्ट्रातील इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. काँग्रेस नेत्यांच्या भेटीसाठी राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधून काँग्रेसचे पदाधिकारी हिमाचल भवनमध्ये दाखल झाले. अनेक समर्थक नाना पटोले यांचे समर्थक दिल्लीत आहेत. त्यांनी नाना पटोले यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणा बाजी केली. “बीजेपी को दे टोले, नाना पटोले नाना पटोले…” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.