भारताच्या अग्निपथ योजनेमुळे नेपाळमधील गोरखा जवानांच्या भरतीवर बंदी; नेपाळ सरकारने दिले स्पष्टीकरण

भारतातील अग्निपथ योजनेवरुन शेजारील राष्ट्रं नेपाळमध्ये या वरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. या योजनेंतर्गत भारतीय सैन्यात गोरखांच्या भरतीवर नेपाळकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे.

भारताच्या अग्निपथ योजनेमुळे नेपाळमधील गोरखा जवानांच्या भरतीवर बंदी; नेपाळ सरकारने दिले स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 8:14 AM

नवी दिल्लीः भारतीय लष्कराच्या अग्निपथ योजनेबाबत (Agneepath Scheme) देशभरात मोठा गदारोळ माजला असतानाच या योजनेबद्दल अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता लष्कराने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर मात्र या योजनेच्या लाभाबद्दल देशातील युवकांचा रोष ओसरला असल्याचे सांगण्यात येत आहे. या योजनेंतर्गत भरती प्रक्रियाही देशात सुरू झाली असून या संदर्भातील एका बातमीने मात्र पुन्हा एकदा अग्निपथ योजना वादात सापडण्याची शक्यता आहे. खरे तर आता नेपाळ या शेजारी राष्ट्राने ‘अग्निपथ योजने’वरून नवा वाद निर्माण केला आहे. या योजनेंतर्गत भारतीय सैन्यात गोरखांच्या (Gorkha) भरतीवर नेपाळकडून (Nepal) अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. नेपाळमधील गोरखा गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय सैन्यात भरती होत आहेत. 1947 मध्ये नेपाळ, भारत आणि ब्रिटन यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता, त्यामध्ये नेपाळी तरुणांना ब्रिटीश आणि भारतीय सैन्यात भरती करण्याचीही तरतूद करण्यात आली होती.

नेपाळचे परराष्ट्र मंत्री नारायण खडके यांनी बुधवारी नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांची भेट घेऊन यावेळी त्यांनी नवीन भरती योजनेंतर्गत नेपाळी गोरखा भरतीची योजना अंमलात आणावी असं आवाहन करण्यात आले होते.

त्रिपक्षीय करारानुसार अग्निपथ योजना

परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांकडून असं सांगण्यात आले की, 1947 च्या त्रिपक्षीय करारानुसार अग्निपथ योजनेअंतर्गत भारतातील नवीन भरती धोरणाला मान्यता देण्यात आली नाही. त्यामुळे हा त्रिपक्षीय करार भारतीय सैन्यात गोरखांच्या भरतीवर आधारित असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भारताकडून जूनमध्ये घोषणा

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान खडके यांच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले की नेपाळ सरकार भारतीय सैन्य भरतीत गोरखांच्या भरतीबाबत सकारात्मक भूमिका घेते, परंतु सरकारकडून याबाबत निर्णय घेतला गेला पाहिजे. याबाबत इतर प्रमुख राजकीय पक्षांनीही भूमिका घेऊन हे याबाबत योग्य तो निर्णय घेतला गेला पाहिजे कारण भारत सरकारकडून नुकताच नवीन लष्कर भरती सुरू केली आहे. जूनमध्ये अग्निपथ योजनेची घोषणा झाल्यानंतर भारत सरकारकडून सांगण्यात आले की, 17 ते 21 वर्षे वयोगटातील युवकांना चार वर्षांच्या कालावधीसाठी भरती करण्यात येणार आहे. त्याचवेळी, त्यापैकी 25 टक्के युवकांना त्यानंतर सेवेत नियमित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.

गोरखा रेजिमेंटमधील 43 बटालियन

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, भारतीय सैन्य नेपाळमधून गोरख्यांना सैनिक म्हणून भरती करत असून भारतातील अग्निपथ ही योजना सुरू ठेवण्यास तयार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटमध्ये 43 बटालियन आहेत आणि यामध्ये भारतीय सैनिक तसेच नेपाळमधून भरती झालेल्या सैनिकांचाही समावेश आहे.

मनोड पांडे नेपाळच्या दौऱ्यावर

नेपाळची ही भूमिका भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या 4 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 5 दिवसीय नेपाळ दौऱ्यापूर्वीच ही गोष्ट समोर आली आहे. जनरल पांडे यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश हा नेपाळ लष्कराचे मानद जनरल ही पदवी प्राप्त करणे असून ही पदवी त्यांना राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांच्या हस्ते प्रदान केला जाणार असल्याचेही सांगण्यता आले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.