AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रपती भवनातील नेताजींच्या ‘त्या’ प्रतिमेवरुन वादंग; सुभाषचंद्र बोसांऐवजी अभिनेत्याचे चित्र?

राष्ट्रपती भवनात रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नेताजींच्या एका प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. तेव्हापासून सोशल मीडियावर या प्रतिमेविषयी प्रचंड चर्चा सुरु झाली. | Netaji Subhash Chandra Bose

राष्ट्रपती भवनातील नेताजींच्या 'त्या' प्रतिमेवरुन वादंग; सुभाषचंद्र बोसांऐवजी अभिनेत्याचे चित्र?
प्रसनजीत चॅटर्जी याने नेताजी सुभाषचंद्र यांच्या जीवनावर आधारित 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'गुमनामी' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. राष्ट्रपती भवनात लावण्यात आलेले चित्र प्रसनजीत चॅटर्जी यांचा असल्याचे सांगितले जात आहे.
| Updated on: Jan 25, 2021 | 5:18 PM
Share

नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांच्या प्रतिमेचे नुकतेच अनावरण करण्यात आले. मात्र, आता या प्रतिमेवरुन वादंग निर्माण झाला आहे. हे छायाचित्र नेताजी बोस यांचे नसून त्यांच्या चरित्रपटातील एका अभिनेत्याचे आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. (President Kovind unveiled Netaji Shbhas Chandra bose painitng and not any actor)

केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती देशभरात ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. यानिमित्ताने राष्ट्रपती भवनात रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नेताजींच्या एका प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. तेव्हापासून सोशल मीडियावर या प्रतिमेविषयी प्रचंड चर्चा सुरु झाली.

या प्रतिमेतील व्यक्ती नेताजी नसून बंगाली अभिनेता प्रसनजीत चॅटर्जी असल्याचा दावा केला जात आहे. प्रसनजीत चॅटर्जी याने नेताजी सुभाषचंद्र यांच्या जीवनावर आधारित 2019 साली प्रदर्शित झालेल्या ‘गुमनामी’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. राष्ट्रपती भवनात लावण्यात आलेले चित्र प्रसनजीत चॅटर्जी यांचा असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, भाजपकडून हे वृत्त फेटाळण्यात आले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांनी हा फोटो पद्मश्री पुरस्कार विजेते चित्रकार परेश मैती यांना दिला होता. या फोटोवरून परेश मैती यांनी नेताजींचे पोर्ट्रेट काढले होते. त्यामुळे या प्रतिमेचा आणि प्रसनजीत चॅटर्जी यांचा काहीही संबंध नाही. हा वाद निरर्थक आहे, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.

‘आता देवच भारताला वाचवू शकतो’

या वादाच्या पार्श्वभूमीवर नेटकरी आणि विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले. तृणमूल काँग्रेसच्या खासदार माहूआ मोईत्रा यांनीही ट्विटरवरुन यासंदर्भातील आक्षेप नोंदवला. “आता देवच भारताला वाचवू शकतो (सरकार नक्कीच काही करु शकत नाही)”, असे म्हटले. तर वरिष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनाही ट्विटवरुन हा फोटो पाहून धक्का बसल्याचं मत नोंदवलं आहे. हा प्रकार खूपच लाजिरवाणा असल्याची टीकाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

‘माझ्या वडिलांना हवा तो सन्मान मिळाला नाही’, सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची खदखद

‘राजकारणासाठी कोरोना लस व्यतिरिक्त अनेक व्यासपीठ, या दोन हात करु’, अमित शाहांचं विरोधकांना थेट आव्हान

काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवली; साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान

(President Kovind unveiled Netaji Shbhas Chandra bose painitng and not any actor)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.