Nitin Gadkari J&K Visit LIVE : गडकरींचा काश्मीर दौरा, अशक्यप्राय जोजिला बोगद्याची पाहणी

| Updated on: Sep 29, 2021 | 12:33 AM

Nitin Gadkari J&K Visit LIVE : जम्मू काश्मीरमधील हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये सुरु होणाऱ्या भारताच्या महत्त्वकांक्षी जोजिला बोगद्याचं (Zojilla Tunnel) काम सुरुवात होत आहे. (MEIL to construct Zojilla Tunnel in Himalayan region). मेघा इंजिनिअरींग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) हे या बोगद्याचं काम करत आहे.

Nitin Gadkari J&K Visit LIVE : गडकरींचा काश्मीर दौरा, अशक्यप्राय जोजिला बोगद्याची पाहणी
Nitin Gadkari_Zojilla Tunnel

श्रीनगर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नितीन गडकरी यांनी 3,612 कोटी रुपये खर्चून बनवण्यात येणाऱ्या 121 किलोमीटरच्या 4 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करून, कामाला हिरवा झेंडा दाखवला. आज दुसऱ्या दिवशी नितीन गडकरी आशियातील सर्वात मोठा बोगदा जेड-मोर ( Z-Mohr ) आणि जोजिला बोगदा (zojila tunnel) या कामांची पाहणी करणार आहेत.

जम्मू काश्मीरमधील हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये सुरु होणाऱ्या भारताच्या महत्त्वकांक्षी जोजिला बोगद्याचं (Zojilla Tunnel) काम सुरुवात होत आहे. (MEIL to construct Zojilla Tunnel in Himalayan region). मेघा इंजिनिअरींग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) हे या बोगद्याचं काम करत आहे.

हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. यात जवळपास 33 किलोमीटर रस्ते बांधले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात यापैकी 18.5 किलोमीटर रस्त्याचं काम होईल. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात 14.5 किलोमीटरचा जोजिला बोगदा बांधण्यात येणार आहे. यात 9.5 मीटर रुंदीच्या दोन पदरी रस्त्याचा समावेश असेल. तसेच बोगद्याची उंची 7.57 मीटर इतकी असेल. हा प्रकल्प पूर्ण करताना अनेक अडथळे येणार आहेत. त्यामुळे अत्यंत कल्पकपणे यावर काम केले जाणार आहे. MEIL ने 4 हजार 509.5 कोटी रुपयांची निविदा सादर करत हा प्रकल्प मिळवला. इतर कंपन्यांच्या निविदा अधिक किमतीच्या असल्याने MEIL ने यात आघाडी घेतली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Sep 2021 10:12 AM (IST)

    Zojilla Tunnel : भारतीय सैन्यासाठी मोठा फायदा

    श्रीनगर ते लेह (लडाख) हा रस्ता वर्षभर सुरु राहण्यात अनेक अडथळे आहेत. श्रीनगर-लडाख हायवे तर हिवाळ्यात बर्फ पडून जवळपास 6 महिने पूर्णपणे बंद असतो. या काळात सैन्याची वाहनं देखील प्रवास करु शकत नाहीत. त्यामुळे पर्यायी रस्त्यांचा अवलंब करुन निश्चित ठिकाणी पोहचणं फार खर्चिक होऊन जाते. यात आर्थिक बोजासह वेळेचाही मोठा अपव्यय होतो. त्यामुळेच कारगील मार्गे सोनामार्ग ते लेह आणि लडाख बोगदा रस्त्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तो आता पूर्णत्वाकडे जातो आहे. हा बोगदा रस्ता पृष्ठभागापासून तब्बल 700 मीटर खोलवर केला जाणार आहे.

  • 28 Sep 2021 10:11 AM (IST)

    Zojila, Z Morh tunnels : काश्मीरमधील अशक्यप्राय बोगदा, भारताचा मोठा फायदा

    गडकरी झेड-मोर बोगद्यालाही भेट देतील, जो सोनमार्गच्या पर्यटकांसाठी प्रवासाचा उत्तम मार्ग आहे. हा बोगदा 6.5 किमी लांब आहे. या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे.

    जोजिला बोगदा 2,300 कोटी रुपये खर्च करून बांधला जात आहे. सोनमर्गच्या पलिकडे, 13.5 किलोमीटर लांबीचा जोजिला बोगदा, जो श्रीनगर आणि लडाख दरम्यान उन-वारा-पाऊस कोणत्याही वातावरणात वापरला जाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे भारतीय लष्करासाठी हा मार्ग सर्वात महत्त्वाचा असेल.

    या बोगद्याचं काम 2026 च्या निर्धारित लक्ष्यापूर्वी पूर्ण केले जाऊ शकते. 4,600 कोटी रुपयांचा जोजिला बोगदा मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रा लिमिटेडद्वारे कार्यान्वित केला जात आहे, तर झेड-मुर्न बोगदा अभियांत्रिकी प्रमुख APCO द्वारे कार्यान्वित आहे. गडकरी मंगळवारी जोजिला बोगद्याच्या प्रगतीची पाहणीही करतील.

  • 28 Sep 2021 10:10 AM (IST)

    Zojilla Tunnel : जोजिल बोगद्याची वैशिष्ट्ये

    जोजिला बोगदा 2,300 कोटी रुपये खर्च करून बांधला जात आहे. सोनमर्गच्या पलिकडे, 13.5 किलोमीटर लांबीचा जोजिला बोगदा, जो श्रीनगर आणि लडाख दरम्यान उन-वारा-पाऊस कोणत्याही वातावरणात वापरला जाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे भारतीय लष्करासाठी हा मार्ग सर्वात महत्त्वाचा असेल.

    प्रकल्पाची वैशिष्ट्ये

    • हिमालाय क्षेत्रात कारगिली मार्गे जम्मू काश्मीर ते लेह असा भारताचा महत्वकांक्षी प्रकल्प • अंदाजे 4 हजार 509.5 कोटींचा प्रकल्प • अत्यंत प्रतिकूल परिस्थित प्रकल्पाचं काम होणार श्रीनगर ते लेह (लडाख) हा रस्ता वर्षभर सुरु राहण्यात अनेक अडथळे आहेत. श्रीनगर-लडाख हायवे तर हिवाळ्यात बर्फ पडून जवळपास 6 महिने पूर्णपणे बंद असतो. या काळात सैन्याची वाहनं देखील प्रवास करु शकत नाहीत. त्यामुळे पर्यायी रस्त्यांचा अवलंब करुन निश्चित ठिकाणी पोहचणं फार खर्चिक होऊन जाते.

Published On - Sep 28,2021 10:08 AM

Follow us
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.