एक देश, एकाच दिवशी पगार, मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना

देशभरातील नियमित वेतनधारी कर्मचाऱ्यांसाठी (फॉर्मल सेक्‍टर) केंद्र सरकारने एक महत्त्वकांक्षी योजना आणली आहे.

One Nation One Pay Day System, एक देश, एकाच दिवशी पगार, मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना

नवी दिल्ली: देशभरातील नियमित वेतनधारी कर्मचाऱ्यांसाठी (फॉर्मल सेक्‍टर) केंद्र सरकारने एक महत्त्वकांक्षी योजना आणली आहे. या योजनेमुळे भविष्यात देशातील सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार एकाच दिवशी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी शुक्रवारी (16 नोव्हेंबर) ‘वन नेशन, वन पे डे सिस्टम’ (One Nation, One Pay Day System) योजनेची माहिती दिली. ते ‘सुरक्षा नेतृत्व संमेलन 2019’ येथे बोलत होते.

संतोष गंगवार म्हणाले, “संपूर्ण देशातील सर्व क्षेत्रात कामगारांना वेळेवर पगार मिळावा यासाठी प्रत्येक महिन्यासाठी एक विशिष्ट पगाराचा दिवस असायला हवा. याबाबतचा कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. अशाचप्रकारे आम्ही सर्व क्षेत्रांसाठी किमान वेतन कायद्यावरही काम करत आहोत.”

2014 मध्ये देशाचा कारभार स्वीकारल्यानंतर मोदी सरकार सातत्याने कामगार कायद्यांमध्ये सुधारण करत आहे. आम्ही 44 किचकट कामगार कायद्यांमध्ये सुधारणेसाठी पाऊलं उचलली आहेत, असंही गंगवार यांनी नमूद केलं.

केंद्र सरकार व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणाची स्थिती आणि वेतनाचे नियम (OSH Code) नव्याने लागू करणार आहे. वेतन कायदा संसदेत मंजूर झाला आहे. आता कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियम बनवण्यात येत आहेत.

दरम्यान, ओएसएच कोड 23 जुलै 2019 मध्ये मंजूर झाला. त्याआधारे खासगी क्षेत्रात नियमितता आणल्या जाणार आहेत. सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणांची स्थिती याच्याशी संबंधित 13 केंद्रीय कामगार कायद्यांना एकत्रित आणले जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *