AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान किसान योजनेचा केवळ 82 टक्के शेतकऱ्यांनाच लाभ

केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 2 हजार रुपये जमा करणे सुरू झाले आहे. सरकारकडून दहावा हप्ता जमा करण्यात येत आहे. मात्र फक्त 82 टक्केच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येत आहेत. यामुळे तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होत आहेत की, नाही हे  एकदा तपासून घ्या.

पंतप्रधान किसान योजनेचा केवळ 82 टक्के शेतकऱ्यांनाच लाभ
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 4:30 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 डिसेंबर 2018 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधीची घोषणा केली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. या योजनेचा 10 वा हप्ता (2000 रुपये) 1 जानेवारी 2022 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेतंर्गत शनिवारपासून खात्यात पैसे जमा होणे सुरू झाले आहे. (Only 82 per cent farmers getting benefits from PM Kisan Fund)

सरकारकडे नोंदणी असलेल्या 82 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र ज्यांच्या खात्यामध्ये काही त्रुटी असतील त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नसल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यातील 100 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. उत्तरप्रदेशसह काही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात त्रुटी असल्याने पैसे जमा झालेले नाहीत. उत्तर प्रदेश – 82 टक्के, राजस्थान- 93 टक्के, गुजरात -86 टक्के, जम्मू काश्मीर -74 टक्के, छत्तीसगड-78 टक्के, आंध्र प्रदेश – 77 टक्के तर तामिळनाडूमधील 76 टक्के शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचले आहेत.

पैसे पोहोचण्यात कोणती अडचण

जर सरकारकडून पाठवण्यात आलेले पैसे खात्यात जमा होत नसतील तर काही अडचण असू शकते. पैसे जमा होणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यापूर्वी फंड ट्रान्फर ऑर्डर असा मॅसेज येतो. जर असा मेसेज असलेला नसल्यास अडचण असू शकते. मेसेज न आलेल्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत. आपले नाव यादीत आहे की, नाही हे पाहण्यासाठी सरकारच्या संकेतस्थळावरून जावून पडताळणी करता येईल. http://pmkisan.gov.in/ या केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची अपलोड करण्यात आली आहे.

संकेतस्थळावर गेल्यानंतर ‘फार्मर कॉर्नर’ येथे क्लिक केल्यानंतर योजनेतील लाभार्थ्यांची यादी दिसून येईल. यात खातेदारांचा बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर किंवा आधार कार्डद्वारे पैसे मिळाले किंवा नाही हे पाहता येईल. संकेतस्थळावर जाऊन स्पेलिंगची पडताळणी करता येईल. बँक खाते आणि आधार क्रमांक यामध्ये बदल असल्यास पैसे जमा होत नाहीत. स्पेलिंग मिस्टेक असेल तर ती चूक दूर झाल्यानंतर पैसे जमा होण्यास सुरूवात होईल. यामुळे आधार आणि बँक खात्यातील नावात एका अक्षराचा देखील बदल असल्यास पैसे मिळत नाहीत. यामुळे पैसे जमा होत नसल्यास आधार आणि बँक खात्यातील नाव सारखे असणे आवश्यक आहे. बेनिफिशरी लिस्टवर क्लिक केल्यास यात राज्य, जिल्हा, तहसील, गट आणि आपल्या गावाचा शोध घेतल्यानंतर यादी येईल. यात कोणत्या शेतकऱ्याचे पैसे थांबलेले आहेत. याची यादी दिसून येईल. पीएम किसान योजना पूर्णपणे आधार कार्डाशी जोडण्यात आली आहे.

इतर बातम्याः

नववर्षाची सुरवात शेतकरी हीताच्या निर्णयाने : पीएम किसानचा हप्ता जारी, अन् शेतकरी उत्पादक कंपन्यांना 14 हजार कोटी

New Year’s changes|1 जानेवारीपासून काय महागलं, काय स्वस्त झालं, घ्या जाणून?

Mumbai Corona Vaccination | लहान मुलांच्या लसीकरणासाठी जम्बो व्हॅक्सिनेशन सेंटर, मुलांना बसण्याची सोय, चॉकलेटही मिळणार

(Only 82 per cent farmers getting benefits from PM Kisan Fund)

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.