Operation Shakti : भारत अणुशक्ती बनण्याची कहाणी
26 वर्षांपूर्वी 1998 साली 11 मे रोजी भारताने राजस्थानच्या पोखरणमध्ये अणुचाचणी करून जगाला धक्का दिला होता. अचानक झालेल्या या अणुचाचण्यांमुळे अमेरिका, चीन आणि पाकिस्तानसह सुपूर्ण जगाला हादरा बसला होता. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली हे मिशन अशा प्रकारे पार पडले की जगाला त्याची कल्पनाही नव्हती.

आजपासून 26 वर्षांपूर्वी 1998 साली 11 मे रोजी भारताने राजस्थानच्या पोखरणमध्ये अणुचाचणी करून जगाला चकित केले होते. भारताने कोणाला ही न कळू देता केलेल्या या अणुचाचण्यांमुळे अमेरिकासह अनेक देश आश्चर्यचकित झाले होते. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली हे मिशन यशस्वीरित्या पार पडले होते. राजस्थानमधील एक छोटसं गाव असलेल्या पोखरणमध्ये भारताने दुपारी ३.४५ मिनिटांनी अणुचाचणी केली होती. भारताने केलेल्या या अणुशक्तीचाचणी विरोधात अनेक देशांनी भारतावर टीका करत निर्बंध लादले होते. पहिली अणुचाचणी यापूर्वी 1974 मध्ये भारताने पहिली अणुचाचणी (पोखरण-1) करून जगाला भारताची ताकद दाखवून दिली होती. 8 मे 1974 रोजी सकाळी ऑल इंडिया...
