Operation Sindoor : नव्या युगाच्या युद्धाचा भारत नायक; पाकसोबतच्या तणावात जगाने पाहिली ताकद
India-Pakistan Tension : 4 दिवसापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव होता. या काळात भारताने त्याची कुटनीती आणि रणनीतीचा परिचय दिला. पाकिस्तानच्या सैन्य ठिकाण्यांसह भारताने दहशतवादी तळ अचूक नष्ट केले. तणावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कडक संदेश दिला.

भारत आणि पाकिस्तानदरम्यान 7 ते 10 मे पर्यंत लष्करी तणाव राहिला. या लढाईत भारत पाकिस्तानवर वरचढ दिसला. 4 दिवसापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव होता. या काळात भारताने त्याची कुटनीती आणि रणनीतीचा परिचय दिला. पाकिस्तानच्या सैन्य ठिकाण्यांसह भारताने दहशतवादी तळ अचूक नष्ट केले. तणावानंतर या बु्द्ध पौर्णिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कडक संदेश दिला. नवी दिल्ली कोणत्याही अणु हल्ल्याआड होणारे ब्लॅकमेल सहन करणार नाही असे पाकला त्यांनी ठणकावले.
नव युगात युद्धात भारताची श्रेष्ठता सिद्ध
4 दिवस चालेल्या या तणावाच्या काळात भारताने पाकिस्तानचे अनेक महत्त्वाचे हवाईतळ नष्ट केले. तर पाकिस्तानने भारतावर डागलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवतेच निष्फळ ठरवले. ऑपरेशन सिंदूर ने दहशतवादाविरोधातील प्रतिक्रियेचा नवीन आयाम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. भारताने वाळवंटामध्ये आणि डोंगररांगामध्ये क्षमतेचे प्रदर्शन केले आणि नव्या युगाच्या युद्धात श्रेष्ठता सिद्ध केली.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान आपल्या मेड इन इंडियातील शस्त्रांच्या विश्वासार्हता सिद्ध केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 21 व्या शतकाच्या युद्धात मेड इन इंडिया संरक्षण उपकरणांचा काळण सुरू झाला आहे, असे ते म्हणाले. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्ताने तर पाकिस्तानच्या चिंधड्या केल्या. भारताने केवळ पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला नाही, तर नव्या युगातील एअर डिफेन्स सिस्टीम वापरून पाकिस्तानचा हल्ला निष्फळ केला. या वृत्तात आकाशतीर आणि एस 400 याचा विशेष उल्लेख केला आहे.
जगाने मान्य केली भारताची ताकद
या लढाई दरम्यान पाकड्यांनी नेहमीप्रमाणेच खोटे प्रचारतंत्र राबवले. अनेक खोटे दावे केले. जेव्हा भारताने हल्ल्यांचे ठोस पुरावे जगासमोर मांडायला सुरुवात केली, तेव्हा भारताने नव्या युगातील युद्धतंत्रात यश मिळवल्याचे जगाने मान्य केले. भारताने स्वदेशी नेव्हिगेशन प्रणालीच्या सहाय्याने शत्रूचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र ओळखले आणि त्यांना अचूक टिपले. पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसत, रडारला चकवा देत त्यांच्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांना मोठा दणका दिला.
पाकिस्तानचा कबुलीजबाब
भारतीय हल्ल्यांनंतर पाकिस्तानला रहीम यार खान एअरबेसचे मोठे नुकसान झाले. पाकिस्तानला स्वतःहून हे नुकसान कबूल करावे लागले. पाकिस्तानचे अनेक महत्त्वाचे एअरबेस लक्ष्य केले होते. उपग्रह चित्रांमधूनही हे नुकसानीचे दर्शन झाले. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा एअरबेसवर भारताने रनवेच्या दोन भागांवर अचूक शस्त्रांचा वापर करून हल्ला केला, असं भारतीय लष्कराने सांगितलं.
