Operation Sindoor : पाकिस्तान खूप मोठा हल्ला करणार, अमेरिकेतून फोन येताच, काय ठरलं? मोदींनी काय केलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरबाबत महत्त्वाची माहिती दिली. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत झालेल्या चर्चेविषयी सगळं काही सांगितलं आहे.

PM Narendra Modi On Operation Sindoor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती दिली. हे ऑपरेशन राबवताना सरकारची भूमिका काय होती? हे ऑपरेशन कसे राबवण्यात आले? याबाबत सांगितलं आहे. विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूर राबवत असताना अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत झालेल्या संभाषणाबद्दलही महत्त्वाची माहिती दिली आहे.
आता अधिक मार खाण्याची आमच्यात ताकद नाही
आमच्यावर एवढा मोठा हल्ला होईल, असा पाकिस्तानने कधीच विचार केला नव्हता. तेव्हा पाकिस्तानने भारताच्या डीजीएमओला फोन करून विनंती केली होती. हे बंद करा. बरंच मारलं. आता अधिक मार खाण्याची आमच्यात ताकद नाही. प्लीज हल्ला रोखा, असं पाकिस्तानचा डीजीएमएकडून आम्हाला विनंती करण्यात आली, असे मोदींनी संसदेत सांगितले.
जगातील कोणत्याही नेत्याने भारताचे हे…
तसेच भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हाच सांगितलं होतं की आम्ही आमचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. परत असं कराल तर महागात पडेल. आमची अॅक्सन नॉन एक्सेलेटरी आहे, हे आम्ही आधीच सांगितलं होतं. त्यामुळेच आम्ही हा हल्ला रोखला. जगातील कोणत्याही नेत्याने भारताचं ऑपरेशन रोखण्यास सांगितले नाही, अशी महत्त्वाची माहिती मोदी यांनी दिली.
…तर त्यांना खूप महागात पडेल
पुढे बोलताना अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षाच्या फोनबाबातही मोदींनी सर्व काही सांगितलं. ९ तारखेच्या रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ते तासभर प्रयत्न करत होते. माझी सैन्यासोबत बैठक चालू होती. नंतर मी त्यांना फोन केला. त्यांनी मला सांगितलं की, पाकिस्तान खूप मोठा हल्ला करणार आहे. त्यानंतर मिही त्यांना सांगितलं की जर पाकिस्तानचा हा हेतू असेल तर त्यांना खूप महागात पडेल, असं मोदींनी संसदेत बोलताना सांगितलं. तसेच पाकिस्तानने हल्ला केला तर आम्ही मोठा हल्ला करून प्रत्युत्तर देऊ. आम्ही गोळीचं उत्तर गोळीने देऊ असं मी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांना सांगितल्याचं मोदी यावेळी म्हणाले.
