AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terror Attack : या हल्ल्यामागे… पाकिस्तानचा कांगावा, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची ती संतापजनक प्रतिक्रिया, भारताला सहकार्य करणार?

Pakistan Reaction on Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबाची एक संघटना द रेजिस्टेंस फ्रंट TRF ने घेतली आहे. तर त्यावर पाकिस्तान सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे.

Pahalgam Terror Attack : या हल्ल्यामागे... पाकिस्तानचा कांगावा, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची ती संतापजनक प्रतिक्रिया, भारताला सहकार्य करणार?
पहलगाम दहशतवादी हल्लाImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 23, 2025 | 12:15 PM
Share

काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा एक गट द रेजिस्टेंस फ्रंट TRF ने घेतली आहे. तर या हल्ल्याचा कट हा पाकिस्तानचे मोठे शहर रावळपिंडीत शिजल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यामागे सैफुल्लाह खालीद हा मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान पाकिस्तान सरकारचा कांगावा यानिमित्त पुन्हा उघड झाला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड

रावळपिंडीत या हल्ल्याचा कट रचला. यामध्ये सहा दहशतवादी होते. त्यात दोन काश्मीरचे होत तर चार दहशतवादी हे पाकिस्तानी होते. त्यातील दोन जण हे पाकिस्तानच्या लष्करातील कमांडो असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दहशतवादांनी हल्ल्यावेळी बॉडीकॅम कॅमेरा लावल्याचे उघड झाले आहे.

ती संतापजनक प्रतिक्रिया

दरम्यान पाकिस्तानचे ख्वाजा आसिफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या दहशतवादी हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. आपला देश सर्व प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया आसिफ यांनी दिली आहे. त्यांनी पाकिस्तानी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. उलट आसिफ यांनी भारतावरच आरोप लावला आहे. या हल्ल्यामागे भारतातीलच लोक असल्याचा कांगावा आसिफ यांनी केला. भारतात नागालँडपासून ते मणिपूरपर्यंत आणि काश्मीरमधील लोक तिथल्या सरकारविरोधात असल्याचे संतापजनक वक्तव्य आसिफ यांनी केले.

इतकेच नाही तर केंद्र सरकार तिथल्या नागरिकांचे अधिकार हिसकावून घेत आहेत. त्यांचे शोषण करत आहे. त्यामुळेच लोक त्यांच्याविरोधात असल्याचा कांगावा आसिफ यांनी केला. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या या बेताल वक्तव्यावर संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्याशी पाकिस्तानचे काही पण देणे घेणे नसल्याचे ते म्हणाले. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. नागरिकांवर असा हल्ला व्हायला नको असे आसिफ म्हणाले. पाकिस्तानच्या या प्रतिक्रियेवर अजून भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. थोड्याच वेळात ११ वाजता दिल्लीत सुरक्षा समितीची उच्चस्तरीय बैठक होत आहे. त्यात रणनीती ठरणार असल्याचे समजते.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.