AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धविरामाला पाक आर्मीकडून वाटाण्याच्या अक्षता, सीजफायर होऊन 4 तासांत पुन्हा हल्ले,या शहरात ब्लॅकआऊट..

पाकिस्तानी सरकार आणि आर्मी यांचे एकमेकांशी काही संबंध राहीलेले नाहीत. पाक सरकारचे त्यांच्या लष्करावर नियंत्रण नसल्याचे उघडकीस आले आहे.कारण सीशफायर होऊनही पाकने पुन्हा जम्मूत गोळीबार केला आहे.

युद्धविरामाला पाक आर्मीकडून वाटाण्याच्या अक्षता, सीजफायर होऊन 4 तासांत पुन्हा हल्ले,या शहरात ब्लॅकआऊट..
| Updated on: May 10, 2025 | 10:24 PM
Share

भारत आणि पाक या युद्धविराम होऊन अवघे चार तास होत नाहीत तोव्हर जम्मू-कश्मीरात पुन्हा ब्लॅकआऊटची वेळ आली आहे. एकीकडे जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आता युद्धविरामामुळे एअर पोर्ट पु्न्हा सुरु करण्यात येऊन एअरस्पेस रिओपन व्हावी, केंद्र सरकारने लवकरात लवकर विमानतळांना सुरु करण्याचा निर्णय घ्यावा म्हणजे श्रीनगरातून हजच्या फ्लाईट सुरु होतील असे शस्रसंधीनंतर ट्वीट करुन तासभर होत नाहीत तेवढ्यात आता पाकिस्तानच्या बाजूने शस्र संधीचे उल्लंघन झाले असून श्रीनगरात ५० हून अधिक स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.

पहलगामवरील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या तणाव पसरला असताना भारत आणि पाकीस्तान यांच्या शनिवारी सायंकाळी अमेरिकेच्या पुढाकाराने दोन्ही देशांच्या डीजीएमओ यांनी शस्रसंधीबाबतच्या कराराची शाई वाळण्यापूर्वीच पाकने त्यांचे उल्लंघन करीत जम्मूत फायरिंग सुरु केली आहे. त्यामुळे जम्मू, काश्मीर, पंजाब राजस्नानात ड्रोन्स दिसल्याचे वृत्त आहे. पंजाब, राजस्थान, जम्मूत ब्लॅक आऊट करण्यात आले आहे. पंजाबच्या नऊ शहरात संपूर्णपणे ब्लॅक आऊट करायची वेळ आली आहे. पंजाबच्या भोगा येथेही ब्लॅक आऊट केले गेले आहे.

 १२ मे रोजी काय होणार ?

राजस्थानच्या जैसलमेर, बाडमेरा येथे वारंवार सायरन वाजत आहेत. या राजस्थानासह गुजरातच्या कच्छमध्येही ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने पाकच्या ड्रोनचा हल्ला परतवून लावत त्यांना नष्ट केले आहे. पंजाबच्या मोगाभागासह नऊ ठिकाणी ब्लॅक आऊट करण्यात आले आहे. १२ मे रोजी आता पुन्हा डीजीएमओची बैठक होणार आहे. त्यात बैठकीत आता भारत आपली बाजू मांडणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....