AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंगालच्या खाडीत घडतंय भयंकर, पाकिस्तानकडून पुन्हा तयारी, थेट 1971 नंतर पहिल्यांदाच..

बंगालच्या खाडीत पुन्हा एकदा पाकिस्तानने हालचाली सुरू केल्यात. थेट बंगालच्या खाडीत त्यांच्याकडून पाणबुडी ठेवण्याचा प्लान पाकिस्तानचा आहे. तशा हाचलाचीही सुरू करण्यात आला. 1971 च्या पराभवानंतर पाकिस्तान पुन्हा एकदा बंगालच्या खाडीकडे बघत आहे.

बंगालच्या खाडीत घडतंय भयंकर, पाकिस्तानकडून पुन्हा तयारी, थेट 1971 नंतर पहिल्यांदाच..
Bengal Submarine
| Updated on: Jun 18, 2026 | 10:00 AM
Share

पाकिस्तानने 1971 च्या पराभवानंतर आता पुन्हा एकदा बंगालच्या खाडीकडे मोर्चा वळवला आहे. 1971 ला झालेल्या दारुण पराभवानंतर बंगालच्या खाडीतून पाकिस्तानने आपले सैन्य काढले. पाकिस्तान आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात पाणबुडी तैनात करण्याच्या तयारीत आहे. पुन्हा एकदा त्यांनी बंगालच्या खाडीत आपली ताकद वाढवण्यास सुरूवात केली. भारतासाठी हा डोक्याला मोठा ताण असणार आहे. पाकिस्तान पुन्हा एकदा बंगालच्या खाडीत काट्या करण्यास सुरूवात करू शकतो. 55 वर्षांनंतर पाकिस्तान चीनकडून मिळवलेली पाणबुडी तिथे तैनात करण्याची तयारी करत आहे. चीनने पाकिस्तानला हंगोरची पहिली पाणबुडी पाकिस्तानच्या नाैदलाकडे सुपूर्द केली. ती गेल्याच आठवड्यात कराची बंदरात दाखल झाली. तीच पाणबुडी आता बंगालच्या खाडीत पाकिस्तान तैनात करण्याच्या तयारीत आहे. 1971 नंतर पाकिस्तानला पुन्हा जाग आल्याचे दिसतंय.

पाकिस्तान नौदलाचे वरिष्ठ अधिकारी याबाबत चर्चा करतानाही दिसत आहेत. 1971 मध्ये हंगोरच्या पहिल्या पाणबुडीने भारतीय नाैदलातील आयएनएस खुखरी ही युद्धनाैका बुडवली होती. त्याच्याकरिताच पाकिस्तानने चीनकडून मिळवलेल्या एका पाणबुडीला हंगोर हे असे नाव दिले आहे. जेणे करून भारताला आठवले जावे की, हंगोर या पाणबुडीने भारताची आयएनएस खुखरी ही पाणबुडी बुडवली होती.

नव्या पाणबुडीला जुन्याच पाणबुडीचे नाव देण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला. पाकिस्तान नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, या पाणबुडीमुळे इस्लामाबादला बंगालच्या उपसागरात आपली उपस्थिती टिकवून ठेवणे शक्य होऊ शकेल. 1971 च्या युद्धानंतर बंगालच्या खाडीत पाकिस्तानी नाैदलाची स्थिती नाहीच्या बरोबरीने राहिली आहे. हा भाग पाकिस्तानपासून खूप जास्त दूर आहे. पाकिस्तानच्या नौदलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे मान्य केले.

बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध दृढ होत असताना आणि भारत सह हिंदी महासागरातील देशांमधील नौदलविषयक स्पर्धा तीव्र होत असतानाच हा निर्णय पाकिस्तानने घेतला. बंगालच्या खाडीत भारत आणि पाकिस्तानमध्ये यापूर्वी तणाव बघायला मिळाला. मात्र, 1971 झाली झालेल्या पराभवानंतर बंगालच्या खाडीचा नाव पाकिस्तानने सोडला होता. चीनकडून पाकिस्तान 8 पाणबुड्यांची खरेदी करत आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी