AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांची मिलीभगत उघड, भारतानं एअर स्ट्राईक करताच आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरावा समोर

आम्ही दहशतवाद्यांना थारा देत नाहीत, दहशतवाद्यांचा आणि आमचा संबंध नाही असा दावा वारंवार पाकिस्तानकडून करण्यात येतो, मात्र आता याचा मोठा पुरावा समोर आला आहे.

पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांची मिलीभगत उघड, भारतानं एअर स्ट्राईक करताच आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरावा समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 07, 2025 | 4:37 PM
Share

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 22 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर देशभरात संतापाचं वातावरण होतं. अखेर भारतानं पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पीओके आणि पाकिस्तामध्ये असलेल्या दहशतवादी अड्ड्यांवर भारताकडून एअर स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधील चार तर पीओकेमधील 5 असे एकूण 9 दहशवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत.  या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवादी अब्दुल रौफ हा देखील मारला गेला आहे.

एकीकडे पाकिस्तानकडून असा दावा करण्यात येत आहे की, आम्ही दहशतवाद्यांना पाठिंबा देत नाही, मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांची मिलीभगत उघड झाली आहे.  भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवादी अब्दुल रौफ हा मारला गेला. अब्दुल रौफच्या दफनविधीवेळी पाक लष्कराचे अधिकारी देखील उपस्थित होते, यावरून पाक लष्कर आणि दहशतवाद्यांची मिलीभगत पुन्हा एकदा उघड झाली आहे.

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं मध्यरात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यामध्ये 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानमधील 4 तर पाकव्याप्त काश्मीरमधील 5 दहशतवाद्यांच्या ठिकाणांचा समावेश आहे.  भारतानं एअर स्ट्राईक करून एकूण 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे.

पाकच्या उलट्या बोंबा

मात्र दुसरीकडे पाकिस्तान आता उलट्या बोंबा मारत असल्याचं दिसून येत आहे. भारतानं ज्या-ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला, तिथे दहशतवाद्यांचे अड्डे नव्हतेच असा दावा पाकिस्तानने केला आहे. एवढंच नाही तर भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये एकही सामान्य मानसाची जीवितहानी झालेली नाही, मात्र असं असताना देखील आमच्या 26 लोकांचा मृत्यू झाला असून, 46 जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारतानं 9 नाही तर सहा ठिकाणी एअर स्ट्राईक केला असा दावाही पाकिस्तानने केला आहे. आम्ही भारताचे पाच लाढाऊ विमानं पाडल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे.  मात्र दुसरीकडे दहशतवाद्याच्या दफनविधीसाठी पाकिस्तान लष्कराचे अधिकारी उपस्थित राहिल्यानं पाकिस्तान आणि दहशतवादाचा संबंध पुन्हा एकदा उघडल झाला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.