Pariksha Pe Charcha 2021: फावल्या वेळात झोपाळ्यावर झुलायला आवडतं; मोदींची विद्यार्थ्यांशी ‘मन की बात’

Pariksha Pe Charcha 2021: फावल्या वेळात झोपाळ्यावर झुलायला आवडतं; मोदींची विद्यार्थ्यांशी 'मन की बात'
पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शालेय-महाविद्यालयीन परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांशी खास संवाद साधला. (Exams Are Opportunity To Shape Life, Says PM Narendra Modi)

भीमराव गवळी

|

Apr 07, 2021 | 8:31 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शालेय-महाविद्यालयीन परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांशी खास संवाद साधला. मुलांना तणामुक्त होऊन परीक्षा कशी द्यायची याचा कानमंत्र देतानाच आनंदी आणि उत्साही राहण्याचं गुपितही सांगितलं. (Exams Are Opportunity To Shape Life, Says PM Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देऊन त्यांच्या शंकांचं निरसनही केलं. यावेळी त्यांनी फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचा कानमंत्रंही दिला. फावल्या वेळेला फावला वेळ समजू नका. फावला वेळ हा तुमच्यासाठी खजिना आहे. रिकामा वेळ म्हणजे एक प्रकारचं सौभाग्यच आहे. फावला वेळ नसेल तर आयुष्य रोबोट सारखं होऊन जातं, असं सांगतानाच जर झोपाळ्यावर झुलायची इच्छा होत असेल तर बिनधास्तपणे झोक्यावर बसण्याचा आनंद घ्या. मला फावल्यावेळेत झोपाळ्यावर झुलायला आवडतं. मी झोपाळ्यावर बसतो. त्यातून मला आनंद मिळतो, असं मोदी म्हणाले.

मुलांना घरात तणावमुक्त ठेवा

यावेळी मोदींनी पालकांनाही सल्ला दिला. शिक्षणाच्या बाबतीत मुलांना कधीच ताण देऊ नका. त्यांना घरातून ताण राहिला नाही तर त्यांच्यावर परीक्षेचाही ताण येणार नाही. मुलांना घरात तणावमुक्त ठेवा. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल, असंही ते म्हणाले.

मुलं स्मार्ट असतात

मुलं खूप स्मार्ट असतात. तुम्ही जे सांगाल ते ही मुलं करतीलच असं नाही. मात्र एक गोष्ट नक्की की तुम्ही जी गोष्ट करत आहात, त्याचं ते अत्यंत बारकाईने निरीक्षण करत असतात आणि तुमचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात, असंही मोदींनी सांगितलं.

मुलांच्या पाठी धावावं लागतं

यावेळी त्यांनी पालकांना सांगितलं की मुलांच्या मागे सतत धावावं लागतं. कारणं ते आपल्यापेक्षाही वेगवान असतात. मुलांना काही गोष्टी सांगण्याची, त्यांना काही शिकवण्याची आणि त्यांना संस्कार देण्याची जबाबदारी कुटुंबाची असते. मात्र, कुटुंबातील मोठी व्यक्ती म्हणून बऱ्याचदा आपणही आपलं मूल्यमापन केलं पाहिजे. तुमचा मुलगा परावलंबी होता कामा नये. तो स्वयंप्रकाशित झाला पाहिजे. मुलांमध्ये जी ज्योत तुम्ही पाहात आहात. ती ज्योत त्यांच्या मनात प्रकाशमान झाली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

स्वप्नं जरुर पाहावे, पण…

मुलांना स्वप्नात रमणं खूप आवडत असतं. स्वप्न पाहणं ही चांगली गोष्ट आहे. पण स्वप्नांना कुरवाळत बसणं योग्य नाही. स्वप्नांसाठी झोपत राहणंही योग्य नाही. त्याच्याही पुढं गेलं पाहिजे. स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संकल्प करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, याकडेही त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. (Exams Are Opportunity To Shape Life, Says PM Narendra Modi)

परीक्षा केंद्राबाहेर टेन्शन सोडा

इन्व्हॉल्व, इंटर्नलाईज, असोसिएट आणि व्हिज्यूअलाईज, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा फॉर्म्युला सर्वात महत्त्वाचा आहे. हा फॉर्म्युल्यामुळे तुमचं मन शांत होईल, असं ते म्हणाले. जेव्हा तुमचं मन सैरभैर असतं. तुमचं चित्त ठिकाण्यावर नसतं, तेव्हा प्रश्न पत्रिका पाहून तुम्ही उत्तरं विसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे तुम्ही तुमचं सर्व टेन्शन परीक्षा केंद्राच्या बाहेर सोडूनच परीक्षेला बसा. बघा किती फरक पडतो ते, असं त्यांनी सांगितलं. (Exams Are Opportunity To Shape Life, Says PM Narendra Modi)

संबंधित बातम्या:

Pariksha Pe Charcha 2021 LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ‘परीक्षा पे चर्चा’ माध्यमातून देशातील विद्यार्थ्यांशी संवाद

Maharashtra Lockdown : व्यापाऱ्यांना आठवड्यातील 3 दिवस दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी द्या, मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Video | ‘मिसेस श्रीलंका’ स्पर्धेच्या मंचावर मोठा हंगामा, मुकुट हिसकावत विजेतीला केले जखमी, पाहा व्हिडीओ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें