स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखा प्रकल्प, देशभरातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचं आवाहन

| Updated on: Apr 07, 2021 | 9:08 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विद्यार्थ्यांच्या शंकाचं निरसन केलं (Pariksha Pe Charcha 2021 LIVE ).

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखा प्रकल्प, देशभरातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचं आवाहन
pm modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन केलं. या कार्यक्रमात देशभरातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारले. या कार्यक्रमादरम्यान मोदी यांनी विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा झाल्यानंतर एक उपक्रम सांगितला आहे. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने अमृतवर्ष साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने मोदी यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प दिला आहे.

नेमका प्रकल्प काय?

“मी सांगतोय त्या मार्गानेच जा, असं मला सांगायचं नाही. मात्र मला आता तुम्हाला एका वेगळ्या परीक्षेसाठी तयार करायचं आहे. या परीक्षेत आपल्याला शंभर टक्के पास व्हायचंच आहे. या परीक्षेत आपल्याला आपल्या भारताला आत्मनिर्भर बनवायचं आहे. लोकल फॉर वोकलचा जीवनमंत्र बनवायचा आहे. माझा आग्रह आहे, जेव्हा तुमच्या बोर्ड परीक्षा संपतील तेव्हा सकाळपासून रात्रीपर्यंत तुमच्या वापरातील कोणत्या वस्तू देशात किंवा परदेशात बनले याचा अभ्यास करा. आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या महोत्सवात आपल्या स्वातंत्र्य सेनानींबाबत तुम्हा सगळ्यांना माहिती मिळावी, यासाठी आपण अभियान सुरु केलं आहे. तुम्हालाही या अभियानासोबत जुडायचं आहे. तुम्ही आपल्या राज्यातील स्वातंत्र्याशी संबंधित 75 घटना शोधून काढा. ही घटना कोणत्या व्यक्तीच्या संघर्षाशी किंवा कोणत्याही क्रांतीविराशी संबंधित असू शकते. या घटनेला तुमच्या मातृभाषेत लिहा. या विषयावर वर्षभर काम करा. यासाठी तुमच्या शिक्षकांची मदत घ्या. डिजीटल माध्यमातून तुमचा हा प्रकल्प सादर करा. पालकांशी, आजी-आजोबांशी चर्चा करा”, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं.

मोदी आणखी काय म्हणाले?

नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे? हा परिक्षा पे चर्चाचा पहिल्यांदा वर्चूअल इडीशन आहे. तुम्ही जाणता आपण गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटाशी सामना करत आहोत. त्यामुळे अनेकांना वेगवेगळं इनोव्हेशन करावं लागत आहे. मलाही आपल्याला भेटण्याचा मोह आवरला गेला नाही. त्यामुळे मलादेखील एका नव्या फॉरमेटमध्ये तुमच्याजवळ यावं लागत आहे. तुम्हाला न भेटणं, तुमच्या चेहऱ्यावरील हास्य न दिसणं यामुळे माझं खूप मोठं नुकसान होत आहे. पण तरीही परीक्षा आहेत. त्यामुळे आपण परीक्षावर चर्चा करुया. यावर्षीही ब्रेक घेणार नाहीत. एक गोष्ट मी जरुर सांगू इच्छितो, ही परीक्षावर चर्चा आहे. पण फक्त परीक्षाचीच चर्चा नाही. भरपूर विषयांवर बातचित होऊ शकतो. हलकंफुलकं वातावरण तयार करायचं आहे.

अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे घाबरायला हवं? तुम्ही पहिल्यांदा परीक्षा देताय का? मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा येते ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला परीक्षेची भीती नाही. तर तुमच्या आजूबाजूचं वातावरण तसं करण्यात आलंय. परीक्षा हेच जीवण असं वातावरण तयार करण्यात आलंय. मी सर्व पालकांना सांगू इच्छितो, ही सर्वात मोठी चूक आहे. आपण आवश्यकतेपेक्षा परीक्षेचा जास्त विचार करतो. आयुष्यात ही काय शेवटची परीक्षा नाही. हा तर छोटासा वाटा आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मित्रमंडळींनी तसं वातावरण तयार करु नका.

पूर्वी आई-वडील मुलांच्या प्रत्येक कामात सोबत असायचे. मुलाची क्षमता आई-वडिलांना माहिती असते. मुलाला प्रोत्साहन दिलं तर त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो. मात्र, आज आई-वडिलांना वेळ नाही. मुलांची क्षमता बघण्यासाठी परीक्षांमध्ये आलेले गुण बघितले जातात. मात्र, परीक्षे व्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये इतर चांगलेही गुण असतात. परीक्षा ही एक संधी आहे. आपल्याला घडवण्याची संधी आहे. पण आपण बऱ्याचदा परीक्षेला जीवण-मरणाचा विषय बनवतो.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Apr 2021 08:44 PM (IST)

    पंतप्रधान मोदींकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखा प्रकल्प

    “मी सांगतोय त्या मार्गानेच जा, असं मला सांगायचं नाही. मात्र मला आता तुम्हाला एका वेगळ्या परीक्षेसाठी तयार करायचं आहे. या परीक्षेत आपल्याला शंभर टक्के पास व्हायचंच आहे. या परीक्षेत आपल्याला आपल्या भारताला आत्मनिर्भर बनवायचं आहे. लोकल फॉर वोकलचा जीवनमंत्र बनवायचा आहे. माझा आग्रह आहे, जेव्हा तुमच्या बोर्ड परीक्षा संपतील तेव्हा सकाळपासून रात्रीपर्यंत कोणत्या वस्तू देशात तर परदेशात बनले याचा अभ्यास करा. आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत. या महोत्सवात आपल्या स्वातंत्र्य सेनानींबाबत तुम्हा सगळ्यांना माहिती मिळावी अभियान सुरु केलं आहे. तुम्ही या अभियानासोबत जुडायचं आहे. तुम्ही आपल्या राज्यातील स्वातंत्र्याशी संबंधित 75 घटना शोधून काढा. ही घटना कोणत्या व्यक्तीच्या संघर्षाशी किंवा कोणत्या क्रांतीविराशी संबंधित असू शकता. या घटनेला तुमच्या मातृभाषेत लिहा. या विषयावर वर्षभर काम करा. यासाठी तुमच्या शिक्षकांची मदत घ्या. डिजीटल माध्यमातून तुमचा हा प्रकल्प सादर करा. पालकांशी, आजी-आजोबांशी चर्चा करा”, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.

  • 07 Apr 2021 08:34 PM (IST)

    ‘आई-वडील, समाजाच्या दबावात राहू नका, स्वत:च्या क्षमतेचा विचार करा, मेहनत करा, नक्की जिंकाल’

    परीक्षेत नापास झालं तर आयुष्यातही नापास झाल्यासारखं का वाटत? असा प्रश्न एका विद्यार्थ्यांनी मोदींना विचारला. त्यावर मोदींनी उत्तर दिलं.

    मोदींचा सल्ला काय?

    तुम्ही असा विचार करु नका. परीक्षेत आलेले गुण तुमच्या योग्यताचं मापक ठरुच शकत नाही. जगभरात असे अनेक लोक आहेत जे परीक्षेत खूप कमी गुणांनी उत्तीर्ण झाले. मात्र, आज ते त्यांच्या क्षेत्रात चांगलं काम करत आहेत.

    तुमता एखादा नातेवाईक एखाद्या क्षेत्रात यशस्वी झाला तर तुम्हालाही त्या क्षेत्रात जाण्याती इच्छा होते. पण हा विचार बरोबर नाही. या विचारामुळेत अनेक विद्यार्थी खूप तणावात जगत आहेत. तुम्ही समाज, आई-वडीलांच्या दबावात राहू नका. त्या पलिकडे जाऊन काय करायला हवं याचा विचार करा. तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल.

  • 07 Apr 2021 08:28 PM (IST)

    मुलांना समजून घ्या, पंतप्रधान मोदींचं पालकांना आवाहन

    "तुम्ही मुलं लहान असताना त्यांच्याशी कसं बोलायचे? तुमचा मुलगा जेव्हा एक वर्षाचा होता तेव्हा त्याला हसवण्यासाठी कशाप्रकारचे आवाज काढायचे? कशाप्रकारचे एक्सप्रेशन करायचे? तसं करताना तुम्ही कधी विचार केला की लोक काय म्हणतील म्हणून? त्यावेळी तुमच्या मुलाच्या मनात काय चाललंय, असा विचार केला? तुम्हाला त्यावेळी आनंद आला म्हणून तुम्ही ते केलं. तुम्ही सर्व सोडून एक लहान मुल बनले. मुलासोबत खेळताना कधी तुम्ही घोडा बनले. कधी मुलाला अंगाखांद्यावर बसवून फिरवलं असेल. तुम्ही खोटंखोटं रडला असाल. तेव्हा कोण काय म्हणेल? असा कधीच विचार केला नाही. पण जेव्हा मुलगा थोडासा मोठा होतो तेव्हा आई-वडील मुलाला प्रत्येक गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न करतात. मुलगा बाहेरच्या दुनियेत पाय ठेवतो तो अनेक गोष्टी बघतो. त्या नव्या वातावरणात तुमता मुलगा आणखी खुलावा यासाठी प्रयत्न करा. त्याच्या प्रत्येक गोष्टीला भावनिकरित्या सोडवा. त्याच्यावर ओरडू नका. त्याचं म्हणणं ऐका. जी गोष्ट चांगली नाही ती मनात रजिस्टर करा. जितकं शक्य असेल तितकं त्याचं म्हणणं समजून घ्या. असं वातावरण तयार करा ज्याने त्यालाच त्याची चूक लक्षात येईल", असं आवाहन मोदींनी पालकांना केलं.

  • 07 Apr 2021 08:09 PM (IST)

    खूप अभ्यास केला पण परीक्षेवेळी लक्षातच राहत नाही, काय करावं? विद्यार्थिनीच्या प्रश्नावर मोदी म्हणतात....

    'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी परीक्षेशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. यापैकी एका विद्यार्थीनीने खूप अभ्यास केल्यानंतरही लक्षात राहत नाही. त्यामुळे उत्तरं लक्षात राहावं यासाठी काय करावं? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं मोदी यांनी मार्मिकपणे उत्तर दिलं.

    पंतप्रधान मोदी यांनी नेमका काय सल्ला दिला?

    आपल्याला मेमरीची जडीबुटी पाहिजे तर? तुम्ही सर्वात आधी तुमच्या मेमरीतून ही भावनाच डिलीट करुन टाका की, तुम्हाला लक्षात राहत नाही. असा तुम्ही विचारच करु नका. तुम्ही जर स्वत:शी संबंधित काही घटना बघितल्या तर तुम्हाला माहित पडेल की, वास्तवात तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात राहतात. जसे की तुमची मातृभाषा. मातृभाषा तुम्हाला कुणी शिकवली होती का? कोणत्याही पुस्तकात याबाबत माहिती नाही. सगळं ऐकूण आपण शिकतो. तुम्हाला जे पसंत आहे ती गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केले होते? ज्या गोष्टी तुमच्या आयुष्याच्या अविभाज्य घटक बनतात त्यांचा कधीच विसर पडत नाही. यासाठी इन्टरलाईज करणं जास्त गरजेचं आहे. अभ्यासाला पाठांतर करण्यापेक्षा त्याला अनुभवा. तुमच्याकडे चांगलं सामर्थ्य आहे.

Published On - Apr 07,2021 8:47 PM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.