AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटी नको होतं तेच घडणार, पेट्रोलचा भाव वाढणारच? सामान्यांची झोप उडाली, गंभीर इशारा

इराण युद्धाची भारताला मोठी झळ बसत आहे. कच्च्या तेलाची किंमत वाढली आहे. असे असतानाच आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतबाबत मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ही माहिती नेमकी काय आहे, ते जाणून घ्या...

शेवटी नको होतं तेच घडणार, पेट्रोलचा भाव वाढणारच? सामान्यांची झोप उडाली, गंभीर इशारा
petrol and diesel priceImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 06, 2026 | 6:43 PM
Share

Petrol Diesel Price Rate : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात फेब्रुवारी महिन्यापासून युद्ध सुरू आहे. मधल्या काळात अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी इराणवर मोठे हल्ले केले आहेत. तर दुसरीडे इराणदेखील या दोन्ही देशांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलेले आहे. इराणने अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी बंद केलेली आहे. यामुळे भारतासह जगभरात कच्च्या तेलाची प्रचंड टंचाई निर्माण झालेली आहे. इराणच्या या भूमिकेचा परिणाम म्हणून भारतात गॅस सिलिंडरची किंमत वाढलेली आहे. असे असतानाच आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

भारतात कच्च्या तेलाची टंचाई असली तरीही अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीची झळ सामान्यांना फारशी बसलेली नाही. परंतु आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आशिया पॅसिफिक विभागाचे संचालक कृष्ण श्रीनिवासन यांनी मोठा आणि गंभीर इशारा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलचा भआव न वाढवल्यास भविष्यात भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर होऊ शकते, असे ते म्हणाले आहेत. सोबतच भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यावर लक्ष द्यावे लागेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

श्रीनिवासन यांनी नेमकं काय केलं?

श्रीनिवासन हे 5 मे रोजी नॅशनल काऊन्सिल ऑफ अप्लाईड इकोनॉमिक्स रिसर्चच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी कच्च्या तेलाचा भाव वाढल्याने त्याचा परिणाम सामान्यांवर आहे. कच्च्या तेलाची किंमत वाढल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची किंमत न वाढल्यास त्याचा परिणाम संपूर्ण बाजारावरच पडेल, असे मत श्रीनिवासन यांनी व्यक्त केले. तसेच खतांची किंमत कमी केल्यास लोकांना बसणारी झळ थोडीशी कमी होईल, असेही ते म्हणाले.

कच्च्या तेलाची किंमत किती वाढली?

इराण आणि अमेरिकेतील वादाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर पडला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने कच्चे तेल महागले आहे. सध्या ब्रेंट क्रूड तेलाचा भाव प्रति बॅरल 110 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, श्रीनिवासन यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भारत सरकार पेट्रोल, डिझेलच्या किमतीत आणखी वाढ करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...