AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Modi on US tariff : पाकिस्तानला ठणकावले, नक्षलवाद्यांना ललकारले, मग टॅरिफच्या मुद्द्यावर मोदी काय म्हणाले’; अमेरिकेचा दबाव कायम?

PM Narendra Modi on US tariff : आज स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावले, नक्षलवाद्यांना ललकारले, मग टॅरिफच्या मुद्यावर ते काय म्हणाले? अमेरिकेचा दबाव कायम आहे का?

Modi on US tariff : पाकिस्तानला ठणकावले, नक्षलवाद्यांना ललकारले, मग टॅरिफच्या मुद्द्यावर मोदी काय म्हणाले'; अमेरिकेचा दबाव कायम?
डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी
| Edited By: | Updated on: Aug 15, 2025 | 10:09 AM
Share

आज स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला चांगलचे सुनावले. लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना थेट संदेश दिला. त्याचवेळी देशातील नक्षलवाद लवकरच संपुष्टात येणार असल्याचे सूतोवाच केले. आता शंभर नाही तर 20 जिल्हेच नक्षलवादाने प्रभावित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी टॅरिफच्या मुद्यावर ते काय म्हणतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मुद्यावर मोदींनी असे उत्तर दिले. ते काय म्हणाले?

मोदी भिंतीसारखा उभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आज देशाला संबोधित केले. त्यांनी या भाषणा दरम्यान टॅरिफच्या मुद्यावरून अमेरिकेला थेट संदेश दिला. शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देतात. त्यांनी भारताला अनेक उत्पादनांचा अव्वल उत्पादक बनवले आहे. भारत शेतकऱ्यांच्या हिताशी अजिबात तडजोड करणार नाही, कोणतेही हानिकारक धोरण स्वीकारणार नाही,असे मोदींनी स्पष्ट केले.

कोणत्याही प्रतिकूल धोरणापासून शेतकरी आणि मच्छीमारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मोदी भिंतीसारखा उभा आहे, असे पंतप्रधानांनी अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाविषयी सूतोवाच केले. पण मोदींनी संपूर्ण भाषणात हा मुद्दा ओझरताच घेतला. त्यांनी भारतावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लादण्यात आलेल्या शुल्काबाबत थेट भाष्य करणे टाळले. त्यांनी टॅरिफ, ट्रम्प अथवा अमेरिका यावर कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे टॅरिफ मुद्यावर अमेरिकेचा दबाव कायम आहे का, असा सवाल विचारल्या जात आहे. पंतप्रधान या मुद्यावर थेट बोलत नसल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.

वाद नको विकासाचे धोरण

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे उदाहरण दिले. ते म्हणाले की एखाद्याची रेषा कमी करण्यात आपण ऊर्जा का कमी करावी. मी माझ्या अनुभवावरून सांगतो की, एखाद्याची रेषा कमी करण्यात, त्याची रेषा पुसण्यात आपण ऊर्जा का खर्च करावी. आपण संपूर्ण ऊर्जेसह आपली रेषा मोठी करू. जर आपण आपली रेषा वाढवली, मोठी केली तर जगाला आपली ताकद कळेल, असा थेट संदेश त्यांनी अमेरिकेला दिला. त्यामुळे या मुद्यावर भारत अमेरिकेशी वाद न घालता आपला मार्ग निवडेल असे त्यांनी स्पष्ट केले.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.