AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोण ? लवकरच संपणार सस्पेन्स, पंतप्रधान मायदेशी, शाह-नड्डांशी करणार विचारमंथन

दिल्लीतील मुख्यमंत्री पदाबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे, मात्र पंतप्रधान मोदी भारतात परतल्यानंतर लवकरच त्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. अमित शहा आणि जेपी नड्डा पंतप्रधान मोदींसोबतच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर दिल्लीत मुख्यमंत्रिपदाची घोषणा करू शकतात.

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोण ? लवकरच संपणार सस्पेन्स, पंतप्रधान मायदेशी, शाह-नड्डांशी करणार विचारमंथन
दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स लवकरच संपणार
| Updated on: Feb 15, 2025 | 8:51 AM
Share

गेल्या आठवड्यात परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्स आणि त्यानंतर अमेरिकेच्या दौऱ्यावरून अखेर भारतात परतले आहेत. त्यांच्या वापसीनंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाबाबत सुरू असलेल्या अटकळींना लवकरच पूर्णविराम लागणार आहे. दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण आणि नव्या सरकारच्या शपथविधी कधी याची तारीख लौकरच जाहीर होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने यासाठी एक फॉर्म्युला तयार केला आहे.

त्याअंतर्गत प्रथम 48 विजयी आमदारांपैकी 15 नावे निवडण्यात आली आणि त्यानंतर 9 नावे जातीय समीकरणाच्या आधारे निश्चित करण्यात आली. या 9 पैकी मुख्यमंत्री, मंत्री आणि सभापती यांची नावे निश्चित होणार आहेत. म्हणजे निवडून आलेल्या आमदारांपैकीच कोणी एक मुख्यमंत्री होईल, हे स्पष्ट आहे.

पंतप्रधानांसोबत लवकरच बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा आणि भाजपचे प्रमुख नेते यांची लवकरच बैठक होणार आहे. आज किंवा उद्या संसदीय मंडळाची बैठक होणार असून त्यावर विचारमंथन झाल्यानंतर दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होणार आहे. त्यानुसार, 17 किंवा 18 फेब्रुवारीला विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते आणि 19 किंवा 20 फेब्रुवारीला शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढच्या आठवड्यात राजधानी दिल्लीत नवे सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होऊ शकतो, ज्यामध्ये एनडीएच्या सर्व नेत्यांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचे समजते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडल्या, तर गेल्या आठवड्यात ( 8 फेब्रुवारी) मतमोजणी होऊन निकाल लागला. या निवडणुकीत भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकल्या आहेत. सत्ताधारी आम आदमी पक्षाला केवळ 22 जागा मिळाल्या असून त्यांनी दिल्लीतील सत्ता गमावली आहे.

या विजयामुळे भारतीय जनता पक्ष 27 वर्षांनंतर दिल्लीत सरकार स्थापन करणार आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांबाबत लवकरच चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणाऱ्या प्रवेश वर्मा यांच्या नावाचीही मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना मुख्यमंत्री बनवले जाऊ शकते.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.