AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला ‘इतक्या’ जागाही मिळणार नाहीत, पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषाणाच्या धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देताना काँग्रेसवर सडकून टीका केली. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 40 चा आकडाही पार करु शकणार नाही, असा मोठा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.

काँग्रेसला 'इतक्या' जागाही मिळणार नाहीत, पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत दावा
| Updated on: Feb 07, 2024 | 3:22 PM
Share

नवी दिल्ली | 7 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर राज्यसभेत चर्चा सुरु आहे. राज्यसभेत या चर्चेसाठी 14 तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. “आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 40 जागासुद्धा पार करणार नाही. काँग्रेस पक्ष विचार करण्याच्याही पलिककडे आउटडेटेड झाली आहे. काँग्रेस पक्षाचा विचार जुना झाला आहे. त्यांनी त्यांचे कामही आउटसोर्स केले आहेत. एवढा मोठा पक्ष, एवढे वर्ष राज्य करणारा पक्ष, काही वेळातच अशी अधोगती. आम्हाला तुमच्याप्रती सहानुभूती आहे. पण डॉक्टर काय करणार, रुग्ण स्वत:… पुढे काय बोलू?”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

“ज्या काँग्रेसने सत्तेच्या लालसेपोठी लोकशाहीचा गळा घोटला, जिने लोकशाहीने निवडून आलेल्या सरकारांना बरखास्त केलं, ज्या काँग्रेसने देशाच्या संविधान आणि लोकशाहीच्या मर्यादांना जेलमध्ये बंद केल्या, ज्यांनी वृत्तपत्रांना टाळे लावण्याचे प्रयत्न केले होते. आता उत्तर आणि दक्षिण भागांना तोडण्यासाठी काहीही वक्तव्ये केली जात आहेत. ही काँग्रेस आम्हाला लोकशाहीवर प्रवचन देत आहे. तुम्ही भाषेच्या नावाने देशाला तोडण्याचा प्रयत्न करत आहात. ज्यांनी ईशान्य भारताला हिंसेत ढकललं आहे, ज्यांनी नक्षलवाद हे एक आव्हान तयार करुन सोडलं आहे. देशाची जमीन शत्रूंच्या नावाने केली. देशाचं सर्व आधुनिकरण रोखलं. आम्हाला आज राष्ट्रीय सुरक्षेवर भाषण देत आहोत, जे स्वातंत्र्यानंतर नेहमी कन्फ्यूज राहिले आहेत”, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.

‘ज्या काँग्रेसला आपल्या नेत्यांवर कोणतीच गॅरंटी नाही ते’

“काँग्रेस 10 वर्षात देशाला 11 व्या नंबरवर घेऊन आळी. आम्ही 10 वर्षात देशाला 5 व्या नंबरवर घेऊन आलो. ही काँग्रेस आम्हाला आर्थिक नीतीवर भाषण ऐकवत आहे. ज्यांनी सामान्य वर्गाच्या गरीबांना कधी आरक्षण दिलं नाही. ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही, ज्यांनी देशाचे रस्त्यांना आपल्याही कुटुंबियांच्या नावे दिली, ते आम्हाला सामाजिक न्यायावर भाषण देत आहेत. ज्या काँग्रेसला आपल्या नेत्यांवर कोणतीच गॅरंटी नाही, आपल्या रणनीतीची गॅरंटी नाही, ते मोदी गॅरंटीवर प्रश्न उपस्थित करत आहेत”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

‘काँग्रेसने चुकीचे समज पसरवले’

“काँग्रेसने चुकीचे समज पसरवले, याचा परिणाम काय झाला? भारताच्या संस्कृती आणि सभ्यता मानणाऱ्यांना हीन भावनेतून बघितलं गेलं. त्यामुळे आपल्या भूतकाळावर अन्याय झाला. आपल्याच संस्कृतीला शिवीगाळ देतात. तुम्ही आपल्याच संस्कृतीला शिवीगाळ दिली तर तुम्ही प्रोगेसिव्ह आहात अशाप्रकारचं नरेटिव्ह तयार केलं गेलं. त्याचं नेतृत्व कुठे होतं ते दुनियेला माहिती आहे. दुसऱ्या देशातून आयात करायचं आणि भारतीय वस्तूंना दुय्यम दर्जा द्यायचा. ही लोकं आजही वोकल फॉर लोकल बोलायला कचरतात”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.