Prashant Kishor : काँग्रेससाठी संकटमोचक ठरू शकतात प्रशांत किशोर? किशोर यांच्या प्रवेशाने होणार काँग्रेसमध्ये अनेक बदल

नवी दिल्ली : देशात पाच राज्यांच्या झालेल्या निवडणूकीत काँग्रेसची (Congress) चांगलीच पिच्छे हाट झाली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये बदल व्हावेत अशी पक्षातील अनेक नेत्यांनी इच्छा व्यक्त केली होती. तर अनेक नेत्यांनी पक्षातील दुसऱ्यानेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उभे केले होते. त्यानंतर पक्षातील वरिष्ठ पातळीवर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (strategist Prashant Kishor) यांना पक्षात घ्यावे अशी चर्चा झाली. […]

Prashant Kishor : काँग्रेससाठी संकटमोचक ठरू शकतात प्रशांत किशोर? किशोर यांच्या प्रवेशाने होणार काँग्रेसमध्ये अनेक बदल
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 6:02 PM

नवी दिल्ली : देशात पाच राज्यांच्या झालेल्या निवडणूकीत काँग्रेसची (Congress) चांगलीच पिच्छे हाट झाली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये बदल व्हावेत अशी पक्षातील अनेक नेत्यांनी इच्छा व्यक्त केली होती. तर अनेक नेत्यांनी पक्षातील दुसऱ्यानेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उभे केले होते. त्यानंतर पक्षातील वरिष्ठ पातळीवर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (strategist Prashant Kishor) यांना पक्षात घ्यावे अशी चर्चा झाली. त्याप्रमाणे आता आगामी पाच राज्यातील निवडणूकांच्या आधी काँग्रेसने किशोर यांना पक्षात घेण्याची तयारी केली आहे. यासोबतच हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही (Sonia Gandhi) राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पक्षातील अंतर्गत चालेली कुरघोडी ही संपवणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पक्षातील गटबाजीवर किशोर बोललं नाही. तर २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्यांचा काँग्रेसमध्ये समावेश केला जात आहे.

विधानसभा निव डणुकीसाठी सोनिया गांधींच्या अजेंड्यामध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. जिथे सचिन पायलट यांनी आपले दंड थोपाटले आहे. राजस्थानमधील पक्षांतर्गत गटबाजी संपवण्यासाठी उदयपूरमध्ये ‘चिंतन शिवार अधिवेशन’ घेण्याची योजना असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पण सध्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना एआयसीसी सचिवालयात वरिष्ठ पदावर जाण्यास सांगितले जाईल का? हा मोठा प्रश्न आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे 70 वर्षीय गेह Sonia Gandhiलोत हे स्वेच्छेने ते पद स्वीकारतील का?

‘माझा राजीनामा सोनिया गांधींकडे’

दिल्लीत सोनिया गांधी आणि सचिन पायलट यांच्या भेटीनंतर राजस्थानमध्ये काहीशी खळबळ उडाली होती. तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांमध्ये जे वक्तव्य केले, यावरूनच याचा अंदाज लावता येतो. ते म्हणाले होते की, आपला राजीनामा काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आहे. तसेच जर काँग्रेसने मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला तर त्याचे कोणालाच संकेत मिळणार नाही. तर चर्चा ही चर्चा होणार नाही. काँग्रेस हायकमांड निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे.

सचिन सोनियांना आश्वासन

विशेष म्हणजे, प्रशांत किशोर यांनी सोनिया आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना सादर केलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या विजयावर भर दिला. विशेषत: राजस्थान आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये. जिथे काँग्रेस थेट सरकार किंवा विरोधी पक्षात आहे. मात्र राजस्थानच्या काँग्रेसमध्ये गेहलोत-सचिन पायलट असे गट पडले आहेत. त्यामुळे कोणाच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या अधिक जागा जिंकू शकतील, हा मोठा प्रश्न आहे. एआयसीसीचे राजस्थानचे प्रभारी सरचिटणीस अजय माकन यांनी सविस्तर अहवाल सादर केल्याचे पक्षातील जाणकारांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी पायलट यांनी सोनियांना कुणासोबतही काम करण्याचे आश्वासन दिल्याचे मानले जात आहे. राजस्थानमध्ये जून 2022 मध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणुका होणार आहेत. काँग्रेसला तीन जागा जिंकण्याची चांगली संधी आहे. तर 24 अकबरमध्ये राजस्थानमधील सुरू असलेली राजकीय कोंडी संपवण्यात राज्यसभेची उमेदवारी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री बदलणार तर कधी?

तर सोनिया गांधी यांच्या डोक्यात पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलण्यानंतर काय झाले हे आहे. जिथे विधानसभा निवडणुकीच्या केवळ 114 दिवस आधी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जागी चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. तसेच एआयसीसी प्रमुखांना माहिती मिळत आहे की, राजस्थानमध्ये खरोखरच मुख्यमंत्री बदलण्याची गरज असेल तर विधानसभा निवडणुकीच्या किमान दीड वर्ष आधी तो बदलावा. आणि बदलायाचा असेल तर तो मे ते जून २०२२ या काळात. दरम्यान हरियाणामध्येही पक्षाची स्थिती काही ठिक नाही. येथे पक्षाला प्रदेशाध्यक्षच नाही. ते प्रदेशाध्यक्ष शोधत आहेत. हरियाणा काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा कुमारी सेलजा यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. सध्या हरियाणा विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांच्याकडे हे पद जाऊ शकते.

कमलनाथ यांची पद सोडण्याची इच्छा

मध्य प्रदेशमधील पक्षाचे अध्यक्ष कमलनाथ यांनी देखील मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर अनुभवी आणि साधनसंपन्न कमलनाथ 2023 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहेत. तसेच ते आपल्या टीममध्ये तरुण नेत्यांना पुढे आणण्यासाठी तयार आहेत. राजस्थानप्रमाणेच मध्य प्रदेशातही जून २०२२ मध्ये राज्यसभेच्या निवडणूका होत आहेत. इथेही काँग्रेसमधील अंतर्गत कलह मिटू शकतो. दोन वर्षांपूर्वी कमलनाथ मुख्यमंत्री असताना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राज्यसभा निवडणुकीपूर्वी बंडखोरी करून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

इतर बातम्या :

Bihar Murder : बिहारमध्ये डबल मर्डर, पती-पत्नीच्या संशयास्पद हत्येने खळबळ

Earthquake : लडाखला भूकंपाचे धक्के; भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल

PM Modi Jammu Kasmir Visit : जम्मू आणि काश्मीरची जनता पंचायती राजपासून वंचित होती, अनुच्छेद ३७० हटवून तुम्हाला ताकद दिली

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.