मोदींचं भाषण लाईव्ह दाखवलं नाही, दूरदर्शनच्या सहाय्यक संचालकाचं निलंबन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण लाईव्ह (PM Modi Live Speech) दाखवलं नाही म्हणून प्रसार भारतीने चेन्नईमधील दूरदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालकांचं निलंबन (Prasar Bharati Suspend Doordarshan Director) केलं आहे.

मोदींचं भाषण लाईव्ह दाखवलं नाही, दूरदर्शनच्या सहाय्यक संचालकाचं निलंबन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण लाईव्ह (PM Modi Live Speech) दाखवलं नाही म्हणून प्रसार भारतीने चेन्नईमधील दूरदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालकांचं निलंबन (Prasar Bharati Suspend Doordarshan Director) केलं आहे. प्रसार भारताने शिस्तभंगाची कारवाई (Disciplinary Action) म्हणत हे निलंबन केलं आहे. आर. वासूमती (R Vasumathi) असं निलंबित अधिकाऱ्याचं नाव आहे. वासूमती यांच्यावर मोदींचं आयआयटी मद्रास (IIT Madras) येथील भाषण लाईव्ह दाखवलं नाही, असा आरोप ठेवण्यात आला आहे.

दुरदर्शन केंद्राच्या (Doordarshan Kendra) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबन आदेशात मात्र निलंबनाचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. केवळ शिस्तभंग केल्याने कारवाईचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कठोर कारवाईमागे मोदींचं भाषण लाईव्ह न दाखवणे हेच मुख्य कारण आहे.

मोदी 30 सप्टेंबरला आयआयटी, मद्रास येथे पदवीदान समारंभात बोलले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित अधिकाऱ्याने सुरुवातीला मेलद्वारे आपल्या वरिष्ठांना मोदींचं भाषण लाईव्ह दाखवायचं की नाही याबद्दल विचारणा केली होती. मात्र, अखेर त्यांनी मोदींचं भाषण लाईव्ह न दाखवण्याचा निर्णय घेतला. याला प्रसार भारतीने हेतूपूर्वक आदेश न पाळल्याचं प्रकरण म्हणत कारवाई केली. प्रसार भारतीने एका पत्रकाद्वारे वासूमती यांचं केंद्रीय नागरी सेवा नियम 1965 नुसार निलंबन केल्याची माहिती दिली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *