धक्कादायक, ओडिशात पोलिसांनी गर्भवती महिलेला कडक उन्हात 3 किमी पायपीट करायला लावली, कारण ऐकून अवाक व्हाल

पोलीस प्रशासनाकडून होणारं असंवेदनशील वर्तन अनेकदा सर्वसामान्यांना त्रासदायक ठरतं. आताही ओडिशात (Odisha) असाच एक प्रकार उघडकीस आलाय.

धक्कादायक, ओडिशात पोलिसांनी गर्भवती महिलेला कडक उन्हात 3 किमी पायपीट करायला लावली, कारण ऐकून अवाक व्हाल


भुवनेश्वर : पोलीस प्रशासनाकडून होणारं असंवेदनशील वर्तन अनेकदा सर्वसामान्यांना त्रासदायक ठरतं. आताही ओडिशात (Odisha) असाच एक प्रकार उघडकीस आलाय. या ठिकाणी एका गर्भवती महिलेला (Pregnant Woman) कडक उन्हात 3 किलोमीटर पायपीट करण्यास भाग पाडण्यात आलं. या प्रकरणी आरोपी महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय (Pregnant woman force to walk 3 km in afternoon heat of summer in Odisha).

संताप होईल अशी ही घटना ओडिशातील मयूरभंज या आदिवासी जिल्ह्यात (Mayurbhanj) घडली. तेथील पोलीस अधीक्षक (SP) स्मिथ परमार यांनी रविवारी (29 मार्च) आरोपी महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केलंय. बक्सला यांनी हेल्मेट घातलेलं नसल्याच्या कारणावरुन एका गर्भवती महिलेला भर उन्हात तब्बल 3 किलोमीटर पायपीट करायला लावल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “बिक्रम बारुली नावाचा एक व्यक्ती रविवारी (28 मार्च) आपल्या 8 महिन्यांच्या गर्भवती पत्नीला मोटारसायकलवरुन रुग्णालयात घेऊन जात होता. चेकअपसाठी जाताना बिक्रमच्या पत्नीने हेल्मेट घातलेलं नव्हतं. त्यामुळे रस्त्यात त्यांना महिला पोलीस अधिकारी रिना बक्सला यांनी थांबवलं. तसेच हेल्मेट न घातल्याबद्दल दंड केला.”

पीडित महिलेच्या पतीकडून ऑनलाईन पेमेंटची तयारी, पण पोलिसांकडून रोख दंडाचा अट्टाहास

महिला अधिकाऱ्याने बिक्रमला नियमांचं उल्लंघन केल्यानं वाहन कायद्यानुसार दंड केला. बिक्रमने हा दंड ऑनलाईन करण्याची तयारी दर्शवली, पण महिला अधिकाऱ्याने दंड रोख भरण्याचा अट्टाहास धरला. तसेच रोख दंड न भरल्याने पीडितेच्या पतीला शरत पोलीस स्टेशनला नेले. त्यामुळे पीडितेला गर्भावस्थेत उन्हातच थांबावं लागलं.

बराच वेळ होऊनही पती परत न आल्याने शेवटी गर्भवती महिलेवर स्वतः पोलीस स्टेशनपर्यंत पायपीट करावी लागली. या महिलेला जवळपास 3 किमी चालावं लागलं. त्यामुळे या पती-पत्नीने संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याविरोधात उप-विभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे (Sub-divisional police officer) तक्रार केली.

हेही वाचा :

VIDEO | भारतातील ‘हा’ धबधबा जगभरात प्रसिद्ध, डोळ्यांचं पारणे फेडणारं दृष्य, येथे एकदा नक्की जा…

ओडिशा विधानसभेत ‘हायव्होल्टेज ड्रामा’, भाजप आमदाराकडून सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, कारण काय?

ओडिशातील जंगलांमध्ये 10 दिवसांपासून धुमसती आग, 3000 प्रकारच्या वनस्‍पती धोक्यात

व्हिडीओ पाहा :

Pregnant woman force to walk 3 km in afternoon heat of summer in Odisha

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI