मोदींचा हाफ चड्डीतला फोटो शेअर करत प्रियंका गांधींचे भाजप नेत्यांना चिमटे

भाजप नेते आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी तरुणी फाटलेल्या जीन्स परिधान करत असल्याबद्दल आक्षेपाहार्य वक्तव्य केलं होतं. (Priyanka Gandhi Jumps Into Ripped Jeans Row)

मोदींचा हाफ चड्डीतला फोटो शेअर करत प्रियंका गांधींचे भाजप नेत्यांना चिमटे
प्रियंका गांधी, महासचिव, काँग्रेस
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 1:38 PM

नवी दिल्ली: भाजप नेते आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी तरुणी फाटलेल्या जीन्स परिधान करत असल्याबद्दल आक्षेपाहार्य वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देशभरातील तरुणींनी सोशल मीडियामध्ये फाटलेल्या जीन्स घातलेले फोटो शेअर करत भाजपचा आणि मुख्यमंत्री रावत यांचा निषेध नोंदवला आहे. या वादात काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही उडी घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे जुने फोटो शेअर करून भाजपला चिमटे काढले आहेत. (Priyanka Gandhi Jumps Into Ripped Jeans Row)

प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय परिवह मंत्री नितीन गडकरी यांचे संघातील फोटो शेअर केले आहेत. संघाच्या कार्यक्रमात पांढरा शर्ट आणि खाकी पँटीत हे नेते आहेत. हाफ पँटीतील त्यांचे फोटो आहेत. हे फोटो शेअर करून त्यावर, अरे देवा!!! गुडघे दिसत आहेत, असं कॅप्शन प्रियंका गांधी यांनी दिलं आहे. हे एक वाक्य आणि फोटो यापलिकडे प्रियांका गांधी यांनी एकही शब्द लिहिलेला नाही. परंतु या एका वाक्यातून आणि फोटोतून त्यांनी भाजपला शालजोडीतून लगावले आहेत. इतरांना फाटलेल्या जीन्समधून शरीर दिसत असल्याची टीका करता मग तुम्ही हाफ चड्डी कशी वापरता? असा सवालच त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला केला आहे. गांधी यांचं हे ट्विट जोरदार व्हायरल होत असून त्यावर कमेंटचा पाऊस पडत आहे. या कमेंट काही कमेंट प्रियंका गांधी यांचं समर्थन करणाऱ्या आहेत तर काही विरोधातील आहेत.

भाजपला सेनेचा सल्ला

मुख्यमंत्री रावत यांच्या या विधानावर शिवसेनेने टीका केली आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट करून टीकास्त्र सोडलं आहे. जे लोक स्त्रिया आणि त्यांच्या कपड्यांना जज करतात त्यामुळे देशाची संस्कृती आणि संस्कारावर परिणाम होतो. मुख्यमंत्री महोदय विचार बदला, तेव्हाच देशही बदलेल, असं चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

उर्मिला मातोंडकर काय म्हणाल्या?

फाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार युवा सांभाळतील. पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय? असा खोचक सवाल शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी ट्विटरवर विचारला आहे.

अमिताभच्या नातीने फटकारले

महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा, त्यानंतर अभिनेत्री गुल पनाग यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर फटकारले आहे. आमचे कपडे बदलण्याआधी स्वत:ची मानसिकता बदला, अशा शब्दात नव्या नवेली नंदाने इन्स्टाग्राम स्टेटसवर फटकारले आहे. याशिवाय ट्विटरवर अनेक युजर्सनी रावत यांच्यावर टीका केली आहे. (Priyanka Gandhi Jumps Into Ripped Jeans Row)

रावत काय म्हणाले होते?

रावत काल (17 मार्च) देहरादून येथील एका कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान केलं. तरुण-तरुणींना संस्काराचे महत्व पटवून देताना रावत यांची जीभ चांगलीच घसरली. “मी एकदा जयपूरहून येत होतो. तेव्हा काही सहकारी माझ्यासोबत होते. दुसऱ्या दिवशी करवाचौथचा सण होता. माझे काही सहकारी दिल्लीचे होते. ते म्हणाले की, वर्षभर पत्नीला नाराज ठेवतो, मात्र करवाचौथच्या या एका दिवशी तरी त्यांचे मन राखावेच लागेल. मग मी त्यांच्यासोबत दिल्लीला जाण्यासाठी निघालो. ज्यावेळी आम्ही विमानात बसलो तेव्हा माझ्या बाजूला एक महिला बसली होती. मी तिच्याकडे पाहिले तेव्हा खाली गमबूट, आणखी वर बघितलं तर तिच्या गुडघ्यावरची जीन्स फाटली होती, हात बघितले तर त्यामध्ये कडेच-कडे, असा तिचा एकूण अवतार होता”, असं रावत म्हणाले. “मी तिची विचारपूस केली तेव्हा तिने दिल्लीला जात असल्याचे सांगितले. मी स्वयंसेवी संस्था (NGO) चालवते असे तिने सांगितले. मात्र, गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून ती एनजीओ चालवते, समाजात जाते, सोबत लहान मुलं आहेत, या सगळ्यातून काय संस्कार होणार?”, असा सवाल त्यांनी केला. (Priyanka Gandhi Jumps Into Ripped Jeans Row)

संबंधित बातम्या:

VIDEO: गुडघ्यावर फाटलेली जीन्स, पायात गमबूट, अशा महिला काय संस्कार देणार; भाजपच्या मुख्यमंत्र्याची मुक्ताफळे

फाटलेली जीन्स युवा सांभाळतील, पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय? उर्मिला मातोंडकरांचं खोचक ट्विट

तिरथ सिंह रावत : कधी आमदारकीचं तिकीट कापलं गेलेल्या अमित शाहांच्या निटकवर्तीच्याकडे राज्याची कमान

(Priyanka Gandhi Jumps Into Ripped Jeans Row)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.