AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhagwant Mann : कोणीच मोठा नाही, नेता असो की धर्मगुरू 424 व्हिआयपींचं संरक्षण काढलं; भगवंत मान सरकारचा मोठा निर्णय

Bhagwant Mann : पंजाबचे माजी डीजीपी पीसी डोगरा यांच्या सुरक्षेतील एक कर्मचारी हटवण्यात आला आहे. या पूर्वी पंजाब सरकारने एप्रिलमध्येच 184 जणांचे संरक्षण काढून घेणार असल्याचं जाहीर केलं होतं.

Bhagwant Mann : कोणीच मोठा नाही, नेता असो की धर्मगुरू 424 व्हिआयपींचं संरक्षण काढलं; भगवंत मान सरकारचा मोठा निर्णय
कोणीच मोठा नाही, नेता असो की धर्मगुरू 424 व्हिआयपींचं संरक्षण काढलं; भगवंत मान सरकारचा मोठा निर्णयImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 28, 2022 | 11:51 AM
Share

चंदीगड: एकीकडे केंद्राची आणि राज्याची सुरक्षा घेण्यासाठी अनेकजण रांगेत असताना दुसरीकडे पंजाबमध्ये (Punjab Government) मात्र नेत्यांपासून धर्मगुरूंपर्यंतच्या सुरक्षा काढण्यात आल्या आहेत. पंजाबमधील भगवंत मान (Bhagwant Mann) सरकारने पाच पन्नास नव्हे तर 424 व्हिआयपींचं तात्काळ प्रभावाने संरक्षण काढून घेतलं आहे. यात राजकीय नेते, निवृत्त पोलीस अधिकारी, धार्मिक गुरुंचाही समावेश आहे. ज्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे त्यात माजी आमदार, माजी पोलीस अधिकारी आणि सध्या कार्यरत असलेल्या पोलिसांचाही समावेश आहे. पोलीस महासंचालकांना ही सुरक्षा हटवण्याचे (Punab Security Withdrawn) निर्देश मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिले आहेत. पंजाबच्या व्यास येथील डेरा राधा स्वामी यांच्या सुरक्षेतील 10 सुरक्षा रक्षक हटवण्यात आले आहेत. मजिठा येथील आमदार गनीव कौर मजिठिया यांच्या सुरक्षेतील दोन सुरक्षा रक्षक हटवण्यात आले आहेत.

पंजाबचे माजी डीजीपी पीसी डोगरा यांच्या सुरक्षेतील एक कर्मचारी हटवण्यात आला आहे. या पूर्वी पंजाब सरकारने एप्रिलमध्येच 184 जणांचे संरक्षण काढून घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यात माजी मंत्री आणि माजी आमदारांसह काही नेत्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे चिरंजीव रनिंदर सिंग आणि काँग्रसचे आमदार प्रतापसिंग बाजवावेरे यांची सुरक्षा हटवण्यात आली होती.

आठ जणांची सुरक्षा काढली

या महिन्याच्या सुरुवातीला आम आदमी पार्टीच्या सरकारने आठ लोकांची सुरक्षा काढली होती. यात अकाली दलाच्या आमदार हरसिमरत कौर बादल, पंजाबचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड आदींचा समावेश होता. या आठ जणांपैकी पाच जणांना झेड सुरक्षा होती. तर तिघांना वाय प्लस सुरक्षा होती. या आठ जणांच्या सुरक्षेसाठी 127 पोलीस कर्मचारी आणि नऊ वाहने तैनात होती.

तिसऱ्यांदा सुरक्षा काढली

याशिवाय पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी, माजी कॅबिनेट मंत्री विजय इंजर सिंग्ला, माजी आमदार परमिंदर सिंह पिंकी, राजिंद्र कौर भट्टल, नवतेज सिंग चीमा आणि केवल सिंग ढिल्लन यांचीही सुरक्षा काढून घेतली आहे. राज्यातील व्हिआयपींची सुरक्षा काढून घेण्याची ही तिसरी वेळ आहे.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.