COVID Test | रिलायन्सची नवी RT-PCR टेस्ट किट, दोन तासात कोरोनाचा अहवाल कळणार

रिलायन्स लाईफ सायन्सेज कंपनीने एक अशी आरटी-पीसीआर किट तयार केली आहे, जी जवळपास दोन तासात कोरोना चाचणीचा अहवाल देईल

COVID Test | रिलायन्सची नवी RT-PCR टेस्ट किट, दोन तासात कोरोनाचा अहवाल कळणार
Follow us
| Updated on: Oct 02, 2020 | 9:04 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर अजूनही कायम आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये (RT-PCR Test Kit) दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा वेळी रिलायन्स लाईफ सायन्सेज कंपनीने एक अशी आरटी-पीसीआर किट तयार केली आहे, जी जवळपास दोन तासात कोरोना चाचणीचा अहवाल देईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्याच्या परिस्थितीत RT-PCR टेस्टचा अहवाल यायला 24 तासांचा वेळ लागतो (RT-PCR Test Kit).

सूत्रांच्या माहितीनुसार, मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सहाय्यक कंपनी रिलायन्स लाईफ सायन्सेजच्या संगणकीय जीवशास्त्रज्ञांनी (Computational Biologists) भारतात SARS-CoV-2 च्या 100 पैकी अधिक जीनोमचं विश्लेषण केलं आणि COVID-19 झालाय की नाही ते माहित करुन घेण्यासाठी रिअल टाईम पीसीआर (RT-PCR) किट तयार केली आहे.

आरटी-पीसीआर किटला आतापर्यंत गोल्ड स्टॅण्डर्ड मानलं जातं. सूत्रांनुसार, रिलायन्स लाईफ सायन्सेजमध्ये वैज्ञानिकांनी तयार केलेल्या किटला आर-ग्रीम किट (SARS COV2-real-time PCR) असं नाव देण्यात आलं आहे आणि योग्य रिझल्टसाठी ICMR ने याला मान्यताही प्राप्त झाली आहे.

ICMR च्या निकषांवर ही किट किती खरी उतरली?

आयसीएमआरची मान्यता प्रक्रिया या किटच्या डिझाइनचा स्वीकारही करत नाही किंवा नाकारत नाही. तसेच, या किटचा प्रयोग किती सहज करता येईल याबाबतही कुठलं प्रमाण नाही. सूत्रांच्या मते, ही किट SARS COV2 विषाणूच्या ई-जीन, आर-जीन, आरएआरआरपी जीनचा शोध लावू शकते. ICMR च्या परिणामांनुसार, किटमध्ये 98.8 टक्के संवेदनशीलता आणि 98.8 टक्के विशेषज्ञता दिसून येते (RT-PCR Test Kit).

2020 च्या अखेरपर्यंत मृत्यू दर कमी होऊ शकतो

या किटला फर्ममध्ये काम करणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांनी तयार केलं आहे. या किटचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ही सहज उपलब्ध होऊ शकते आणि याचा वापर करणेही अगदी सहज आहे, असं सांगण्यात येत आहे.

तर, रिलायन्स लाईफ सायन्सेजने एका वेगळ्या अभ्यासाचे संकेत दिले आहेत. COVID-19 चा मृत्यू दर 2020 च्या अखेरीस कमी होण्याची शक्यता असल्याचंही सांगितलं जात आहे.

RT-PCR Test Kit

संबंधित बातम्या :

चिंता वाढली! कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांच्या संख्येत वाढ, रोज 1100 लोकांचा मृत्यू

सप्टेंबरमधील संसर्गाचा दर सर्वाधिक, आता तरी कोरोना चाचण्या वाढवा; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.